वास्को : रात्रीच्या वेळी दक्षिण गोव्यातील मांगोरहील, वास्को येथे गस्तीवर (पेटरोलींग ड्यूटी) असलेल्या पोलीसांना दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ देत पोलीसांना त्यांच्या कामात अडथळा आणल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्या तरुणांनी दारूच्या नशेत पोलीसांना धक्का बुक्की करून शिवीगाळ देण्याबरोबरच स्व:तावर बाटलीने हल्ला करून स्व:ताला जखमी करण्याचे कृत्य केले. दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्याने अटक केल्ल्या तरुणांची नावे अमित अशोक कामत (वय १८, मांगोरहील - वास्को) आणि फहाद इमत्याज तिनवाले (वय २५, मांगोरहील - वास्को) अशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास ती घटना घडली. पोलिसांच्या ‘पीसीआर व्हॅन रोबट ४३’ वाहनातून वास्को पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने गस्तीवर होते. मांगोरहील, वास्को येथील मारुती मंदिरासमोर पोलीसांचे वाहन पोचले असता त्यांना तेथे अमित आणि फहाद हे तरुण मद्यपान करताना दिसून आले. मध्यरात्रीनंतर सार्वजनिक स्थळावर मद्यपान करत असल्याने पोलीसांनी त्यांना जाब विचारून तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अमित आणि फहाद यांनी ड्यूटीवर असलेले पोलीस हवालदार जयेश गावकर याला धक्काबुक्की करण्यास सुरवात केली.
तसेच त्यांनी दारूच्या नशेत ड्यूटीवर असलेल्या पोलीसांना त्यांचे काम करण्यास बेकायदेशीररित्या अडथळा निर्माण केला. दारूच्या नशेत त्या तरुणांनी पोलीसांना शिवीगाळ करण्यास सुरवात करून तेथे धांगडधिगाणा घालणे चालूच ठेवले. त्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या बियर बाटलीने स्व:तावर हल्ला करून स्व:ताला जखमी करून घेतल्याची माहीती पोलीसांनी दिली. दारूच्या नशेत धांगड धिगाणा घालणाºया त्या दोन्ही तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर वास्को पोलीस स्थानकावर आणले. तसेच त्यांच्याविरुद्ध भादस ३५३, ५०४ आरडब्ल्यु ३४ कलम आणि इंडीयन पोलीस एक्ट कायद्याच्या ३४ (६) कलमाखाली गुन्हा नोंद करून गुरूवारी (दि.१३) पहाटे ४.३० च्या सुमारास अटक केली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.