भ्रष्टाचार उघड होणार ह्या भयानेच श्वेतपत्रीका काढण्यास सरकार घाबरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:57 PM2020-07-24T18:57:58+5:302020-07-24T18:58:16+5:30

काँग्रेसचा आरोप:  जे. पी. नड्डानी गोव्याच्या ज्वलंत प्रश्नावर काय उपाय सुचविले ? 

The government is afraid to issue a white paper for fear of exposing corruption | भ्रष्टाचार उघड होणार ह्या भयानेच श्वेतपत्रीका काढण्यास सरकार घाबरते

भ्रष्टाचार उघड होणार ह्या भयानेच श्वेतपत्रीका काढण्यास सरकार घाबरते

Next

मडगाव :गोव्यातील डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 'डीफेक्टीव्ह' भाजप सरकारला राज्याची अर्थव्यवस्था व कोविड हाताळणी याबद्दल श्वेतपत्रीका काढल्यास सरकारचा भ्रष्टाचार उघड होण्याची भिती आहे व त्या भयानेच मुख्यमंत्री श्वेतपत्र जारी करण्यास घाबरतात असा आरोप 

काॅंग्रेस अध्यक्ष गिरीेश चोडणकर यांनी केला आहे.  सरकार मागील आठ वर्षातील कारभाराची खरी माहिती लोकांसमोर ठेवण्याची हिम्मत दाखवत नाही असे गिरीश चोडणकर पुढे म्हणाले. 

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यातील भाजप नेत्यांबरोबर दोन दिवसांमागे घेतलेल्या आभासी बैठकीत गोमंतकीयांना भेडसावणारे कोविड हाताळणी, ढासळलेली अर्थव्यवस्था, म्हादई पाणी तंटा, पर्यावरणाला बाधा पोचवणारे प्रकल्प, रेल्वेमार्ग दुपदरीकरण, करमल घाटातील झाडांची कत्तल, ॲानलाईन शिक्षण व्यवस्था, बंद पडलेला खाण व पर्यटन व्यवसाय, बेरोजगारी तसेच गृहआधार, विधवा, दिव्यांग व्यक्तिंचे बंद पडलेले मासिक पेंशन अशा विषयांवर कोणते उपाय सुचविले हे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानी जाहिर करावे अशी मागणी  चोडणकर यानी केली आहे. 

 

भाजप सरकारने गोव्यात सत्तेत आल्यापासुन भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असुन, त्यामुळेच मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याना विधानसभेत व बाहेर विरोधकाना तोंड देण्याची हिम्मत नाही. कोविड संकटकाळातही मुख्यमंत्र्यांपासुन सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण जनतेच्या पैशांची लूट करीत आहेत असा आरोप गिरीश चोडणकर यानी केला आहे. जनता मदतीसाठी याचना करीत असताना भाजप केवळ आभासी सभा व उत्सव साजरे करीत आहे.सरकार जाणीवपुर्वक लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असुन, सरकार निवडक मतदारसंघात वाटत असलेल्या आर्सेनिक अल्बम३० गोळ्यांच्या सेवनाचा विपरीत व दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री व केंद्रिय आयुषमंत्री घेणार का या मी विचारलेल्या प्रश्नावर त्या दोघांनी मौन बाळगले आहे व एक प्रकारे माझ्या दाव्याला संमतीच दिली आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

 

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले रिकामे ठेवणे तसेच ऐन संकटकाळात सदर इस्पितळाचा पुर्ण वापर न करणे यावर आरोग्यमंत्र्यांचा छूपा अजेंडा असल्यानेच ते गप्प आहेत.सरकारने त्वरीत स्मृतीस्थळ, प्रकल्पांचे नुतनीकरण असा वायफळ खर्च  व भाजपचा भ्रष्टाचार बंद न केल्यास लोक रस्त्यावर येतील व प्रचंड जनक्षोभाला सरकारला तोंड द्यावे लागेल हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: The government is afraid to issue a white paper for fear of exposing corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.