शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई

By किशोर कुबल | Published: February 04, 2024 10:10 PM

मंगळवारी मडगाव येथे सभा : चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी, प्रचाराचाही नारळ फोडणार  

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी ६ रोजी गोवा दौय्रावर येत असून बेतुल येथे ‘इंडिया एनर्जी वीक’चे उद्घाटन व मडगांव येथे जाहीर सभा असे त्यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. सभेला अवघेच काही तास राहिल्याने सरकारी यंत्रणांची लगीनघाई चालली आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मोदी या जाहीर सभेत भाजपसाठी प्रचाराचा नारळ फोडतील. सभेला ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल , असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. मंडल अध्यक्ष, आमदार, पदाधिकारी यांच्यावर लोक आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.जाहीर सभेत पंतप्रधानांच्या चार वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि तीन प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. कुंकळ्ळी येथे एनआयटी, दोनापॉल येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथे आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडें कचरा प्रकल्पाचे वर्चुअल पद्धतीने ते उद्घाटन करतील तसेच रेइश मागुश येथे पीपीपी तत्वावर यु घातलेला रोपवे प्रकल्प, पाटो, पणजी येथे थ्री डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपें, साळावली येथे १०० एमएलडी  जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते व्हर्चुअल पध्दतीनेच होणार आहे.

जाहीर सभेवेळी मुख्यमंत्री गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा रिपोर्ट मोदींना देतील तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या काही सरकारी अधिकाय्रांना मोदींहस्ते सन्मानित केले जाईल. तत्पूर्वी बेतुल येथे ‘इंडिया एनर्जी वीक’चे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. तीन दिवस चालणार असलेल्या या परिषदेत १७ देशांचे ऊर्जामंत्री व ३५ हजार प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सध्या विधानसभा अधिवेशन चालू असून मोदींच्या सभेमुळे उद्या मंगळवारी कामकाज होणार नाही. त्याऐवजी शनिवारी १० रोजी कामकाज ठेवण्यात आले आहे. जाहीर सभेच्यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी उद्या मंगळवारी मडगांव शहरातील विद्यायलांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. बेतुल, मडगांव व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून छावणीचे स्वरुप येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी