पणजी : पर्वरी येथील सचिवालयाकडे आंदोलन करून झाल्यानंतर पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन केले. दुस:याबाजूने सरकारने आक्रमक भूमिका घेतली असून जे कुणी पॅरा शिक्षिक किंवा शिक्षिका आज शनिवारी सेवेत रुजू होणार नाही, त्यांची नियुक्ती रद्दबातल ठरणार आहे, असे स्पष्ट करणारा आदेश शुक्रवारी सायंकाळी सर्व शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक एन. होन्नेकेरी यांनी जारी केला आहे. सरकारच्या भूमिकेनंतर व काही आमदारांनीही मध्यस्थी केल्यानंतर बहुतांश पॅरा शिक्षिका सेवेत रुजू होण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली.
दि. 25 रोजी किंवा तत्पूर्वी जे पॅरा शिक्षक सेवेत रुजू झाले, त्यांची नावे सहा महिन्यांच्या एनआयओएस ब्रीज कोर्ससाठी नोंद करता येतील. जे दि. 25 तारीखर्पयत सेवेत रुजू होत नाहीत, त्यांना नोकरी गमवावी लागेल, त्यांचे ऑफर ऑप अपॉइन्टमेन्ट पत्र रद्द ठरत असल्याचे सर्व शिक्षा अभियानाने जाहीर केले आहे. विरोधी काँग्रेस पक्षाने मात्र सरकार असंवेदनशील पद्धतीने पॅरा शिक्षिकांशी वागत असल्याची टीका शुक्रवारी काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली.
गुरुवारी सायंकाळी आंदोलन केलेल्या पॅरा शिक्षिका रात्रभर पर्वरी येथील सचिवालयाच्या मुख्य गेटसमोर बसून राहिल्या. सकाळी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिका:यांनी सचिवालय परिसरात 144 कलम लागू करून जमावबंदी आदेश जारी केला. तिथे मोठय़ा प्रमाणात पोलिस फौज आणण्यात आली. त्यानंतर पॅरा शिक्षिका व महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी शिक्षण खाते गाठले. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांना त्यांनी निवेदन सादर केले व भाजप सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार याचवर्षी पॅरा शिक्षिकांना सेवेत कायम केले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर दिवसभर शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन करण्यात आले. विद्यमान सरकार हे यु-टर्न सरकार आहे, अशी टीका पॅरा शिक्षिकांनी केली. सर्व शिक्षा अभियानाने आदेश जारी केल्याचे कळताच पॅरा शिक्षिकांनी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. दोघा आमदारांनीही मध्यस्थी केली.
यु-टर्नचा निषेध: काँग्रेस (चौकट)
दरम्यान, काँग्रेसचे कायदा विभाग प्रमुख यतिश नायक यांनी प्रतिमा कुतिन्हो, सावित्री कवळेकर, ऐश्वर्या साळगावकर आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. भाजपचे अध्यक्ष तेंडुलकर यांनी तसेच नंतर र्पीकर यांनीही पॅरा शिक्षिकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले व निवडणुकीपुरता त्यांचा वापर केला. स्वत:चाच शब्द न पाळणारे हे सरकार आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यातही आश्वास दिले होते. या पॅरा शिक्षिका गोमंतकीय आहेत. त्यांच्याविरोधात सरकारने पोलिस फौजफाटा वापरणो, त्यांना ढकलणो, त्यांच्याशी गैर वागणो याचा आम्ही निषेध करतो असे यतिश नायक व कुतिन्हो यांनी सांगितले. सचिवालयासमोर आंदोलन करून त्यांनी काहीच चुकीचे केलेले नाही. ही लोकशाही आहे. बेटी बचावो, बेटी पढाओ म्हणणारे सरकार मुलींना शिकवण्याचे काम करणा:या पॅरा शिक्षिकांशी मात्र अमानुषपणो वागत आहे. आम्ही याचा निषेध करतो, असे कुतिन्हो म्हणाल्या. महिला शिक्षिकांना शब्द देऊन फसवणारे सरकार यु-टर्न मास्टर आहे, अशी टीका त्यांनी केली. गेली अनेक वर्षे या शिक्षिकांनी काम केले आहे. आम्ही शिक्षिकांना सेवेत रुजू होण्याचा सल्ला दिल्याचे त्या म्हणाल्या.