शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

सरकार गोव्याच्या कीनारी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत गंभीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गस्ती नौकेचे अनावरण

By पंकज शेट्ये | Published: April 13, 2023 8:30 PM

कीनारी भागात बेकायदेशीर कृत्ये खपवून घेणार नाही: मुख्यमंत्री

वास्को: गोवा कीनारी राज्य असल्याने आमचे सरकार कीनारी सुरक्षेबाबत एकदम गंभीर असून ती आणखीन शक्तीशाली बनवण्याच्या उद्देशानेच गोवा सरकारने गोवा पोलीसांसाठी स्व:ताच्या खर्चातून १५ मीटर जलद इंन्टरसेप्टर गस्ती नौका खरेदी केले आहे. १६ एप्रिल पासून ‘जी २०’ ची सुरवात होणार असल्याने त्यापूर्वी गोव्यातील कीनारी सुरक्षा आणखीन शक्तीशाली करायची असून गोवा पोलीसांना दिलेल्या गस्ती नौकेमुळे कीनारी सुरक्षा आणखीन शक्तीशाली बनवण्यास नक्कीच मदत मिळेल. गोवा पोलीसांनी ९८ टक्के गुन्हेगारीचा शोध लावल्याने यासाठी ते देशातील पहील्या क्रमांकावरील पोलीस असून गोव्याचा मी गृहमंत्रीसुद्धा असल्याने मला त्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोवा शिपयार्डतर्फे गोवा पोलीसांच्या कीनारी पोलीसांसाठी ५.२५ कोटी खर्चूंन बांधलेल्या जलद इंन्टरसेप्टर गस्ती बोटचे गुरूवारी (दि.१३) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते अनावरण केल्यानंतर ती नौका गोवा पोलीसांच्या ताफ्यात शामील झाली. तसेच सुरक्षेत वाढ करण्यासाठी गोवा पोलीसांसाठी आणलेले ३ अनमेंन्ड एरियल वेहीकल (द्रोण कॅमेरा) यावेळी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर व्यासपिठावर केंद्रीय राज्य पर्यटन आणि बंदरमंत्री श्रीपाद नाईक, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, गोव्याचे मुख्यसचिव पुनीत कुमार गोयल, गोवा पोलीस महासंचालक जस्पाल सिंग, गोवा शिपयार्डचे चेअरमन आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गोवा पोलीसांसाठी बांधलेल्या गस्ती नौकेचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलताना म्हणाले की गोवा कीनारी राज्य असल्याने येथील सरकार कीनारी सुरक्षेचा विषय एकदम गांर्भीयाने घेतो. गोव्याच्या कीनारी पोलीसांशी असलेल्या ९ गस्तीनौका नादुरूस्त झाल्याने येथील कीनारी क्षेत्राची सुरक्षा शक्तीशाली ठेवण्यासाठी गोवा शिपायार्डने बांधलेल्या गस्ती नौकेची एकदम गरज होती.

लवकरच ‘जी २०’ ची सुरवात होत असून त्याकाळात गोव्याच्या कीनारी सुरक्षेत वाढ करण्यासाठी पोलीसांना ह्या गस्ती नौकेचा मोठा फायदा मिळणार आहे. गोवा शिपयार्डने दिलेल्या वेळेत गस्तीनौका बांधून गोवा पोलीसांच्या ताब्यात दिल्याने त्यांचे अभिनंदक करणे गरजेचे असल्याचे सावंत म्हणाले. ह्या गस्तीनौकेवर अत्याधूनिक साधन सुविधा, हत्यारे असल्याने पोलीसांना कीनारी क्षेत्रात कडक सुरक्षा ठेवण्यासाठी उत्तम फायदा होणार आहे. काही वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या हल्यानंतर देशाच्या कीनारी भागात कडकरित्या सुरक्षा ठेवणे एकदम गरजेचे झालेले असून त्यासाठी गोवा सरकार सुद्धा सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याच्या कीनारी क्षेत्रात सुरक्षेत वाढ करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला आम्हाला आणखीन गस्ती नौका देण्याचे लिहलेले असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दाखवलेली आहे. गस्ती नौकेबरोबरच पोलीसांच्या ताफ्यात तीन उच्च दर्जांच्या कॅमेरासहीत द्रोण शामील झाल्याने पोलीसांना सुरक्षेत वाढ करण्याकरिता मदत मिळणार आहे. गोवा पोलीसांनी ९८ टक्के गुन्हेगारींच्या प्रकरणांचा छडा - शोध लावल्याने त्यासाठी ते देशात पहील्या क्रमांकावर असून त्याचा मला अभिमान असल्याचे सावंत म्हणाले. १६ एप्रिल पासून ‘जी २०’ ची सुरवात होत असून त्याकाळात गोव्यात सुरक्षा, स्वच्छता ठेवण्यासाठी आम्हाला सर्वांचे सहकार्य पाहीजे असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘जी २०’ च्या निमित्ताने गोव्यात ८ बैठका होणार असून त्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रालाही फायदा होणार असे ते म्हणाले. 

गोवा पोलीस महासंचालक जस्पाल सिंग यांनी गोव्याची कीनारी सुरक्षा आणखीन शक्तीशाली बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यानेच ही गस्ती नौका पोलीसांच्या ताफ्यात शामील होत असल्याचे सांगितले. कीनारी पोलीसांशी असलेल्या ९ गस्तीनौका नादुरूस्त झाल्याने त्या दुरूस्त करून पुन्हा कार्यात आणण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. कीनारी पोलीसांशी गस्ती नौका नसल्याने मागील काळात अयोग्य पद्धतीने होणारी मासेमारी, बेकायदेशीर रित्या वाळू काढण्याच्या प्रकारावर आळा आणण्यासाठी पोलीसासमोर एके प्रकारे दिव्यांगासारखी परिस्थिती निर्माण व्हायची, मात्र आता ही गस्ती नौका आल्याने कीनारी क्षेत्रात अयोग्य प्रकार रोखण्यासाठी पोलीसांना मोठा फायदा होणार असे गोवा पोलीस महासंचालक जस्पाल सिंग म्हणाले.

कीनारी भागात बेकायदेशीर कृत्ये खपवून घेणार नाही: मुख्यमंत्रीमागील काही दिवसापासून गोव्याच्या विविध कीनारी भागात आम्हाला भिकारी आणि अन्य काहींकडून करण्यात येणाºया बेकायदेशीर - अयोग्य गोष्टींबाबत ऐकायला मिळते. गोव्याच्या कीनारी भागात बेकायदेशीर आणि अयोग्य गोष्टी मूळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत. कीनारी भागात बेकायदेशीर - अयोग्य गोष्टी करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे मी गोवा पोलीस महासंचालकांना कळविल्याची माहीती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्याच्या कीनारी भागात देशातील विविध भागाचे नागरिक आणि काही नेपाळी नागरिक सुद्धा विविध व्यवसाय करत असून कीनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने कडक नजर ठेवण्याबाबतचा आदेश मी पोलीसांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत