म्हापसा : गोव्यात आलेल्या पर्यटकांनी माघारी जाताना आपली फसवणुक झाली आहेअसा संदेश पर्यटकांनी आपल्या सोबत घेऊन जाणेराज्यातील पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत चुकिचे आहे. पर्यटकांची सुरक्षा तसेच त्यांचे हित अत्यंत महत्वाचेआहे. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी असे प्रकार गंभिरतेनेहाताळून त्यात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.
मागील काहि दिवसात कळंगुट परिसरात पर्यटकांची झालेली फसवणुक, मारहाण सारख्या प्रकारांवर भाष्य करताना पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात येणाºया पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याची प्रलोभने दाखवली जातात. दिलेल्या आश्वासना प्रमाणे पर्यटकांना सुविधा दिल्या जात नाहीत. उलट त्यांना मारहाण करुन त्यांची फसवणुक केली जाते. जे बेकायदेशीर दलाल असे प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाईसाठी सरकारकडून वेगळ््या कायद्याची तरतुद करणे गरजेचे आहे. असलेली दंडाची रक्कम वाढवून १० हजारावरून २५ हजार झाली पाहिजे असे लोबो म्हणाले.
पर्यटकांच्या फसवणुकीचे प्रकार घडल्यावर पोलीस तातडीने कारवाई करतात पण असे प्रकार घडण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात त्या आस्थापनाचा परवाना पंचायतीने रद्द केला पाहिजेअशीही माहिती त्यांनी दिली.
कारवाईसाठी कायदे असले तरी त्यात दुरुस्तीची गरज आहेदुरुस्तीची गरज असलेल्या कायद्यांचा लाभ उठवून बेकायदेशीर प्रकार करणारे सहज सुटून जातात. हे कुठे तरी बंद होणे गरजेचे असल्याचे लोबो म्हणाले.
डान्सबार सारखे प्रकार चालवणाºयांना सरकारकडून कडक संदेश गेला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायद्यात दुरुस्ती करुन कारवाई संदेश दिल्यास पर्यटकांची फसवणुक बंद होईल. न पेक्षा पर्यटकांच्या सुरक्षेवर परिणाम होऊन व्यवासायवरही परिणाम होईल. तसेच गोव्यात येऊन चुकिच्या पद्धतीने वागणाºया पर्यटकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचेही मत लोबो यांनी व्यक्त केले.