शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आपत्तीग्रस्तांना सरकार मदत करणार, कायदेशीर शॅकना पाठिंबा : खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 5:50 PM

पणजी : राज्यात ओखी वादळाच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका ज्या शॅक व्यावसायिकांसह अन्य घटकांना बसला, त्यांना सरकार नुकसान भरपाई देईल.

पणजी : राज्यात ओखी वादळाच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका ज्या शॅक व्यावसायिकांसह अन्य घटकांना बसला, त्यांना सरकार नुकसान भरपाई देईल. जे शॅक कायदेशीर पद्धतीने व कायद्याच्या चौकटीत राहून उभे केले होते, त्यांना सरकार मदत करील, असे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी येथे सांगितले. राज्यातील खाजन बांध आणि मानशीच्या सुरक्षेबाबत येत्या दि. 20 ते 25 डिसेंबरपर्यंत सर्व मामलेदारांनी अहवाल सादर करावा, अशीही सूचना मंत्री खंवटे यांनी केली.राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मंत्री खंवटे, मुख्य सचिव शर्मा तसेच दोन्ही जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री खंवटे यांनी सांगितले, की वादळाचा फटका पूर्ण राज्याला बसलेला नाही. फक्त पेडणे, बार्देश, सासष्टी या तीन तालुक्यांमधील किनारी भागातील शॅक व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळे राज्य आपत्ती जाहीर न करता आम्ही नैसर्गिक आपत्ती म्हणून या घटनेकडे पाहत आहोत. राज्य आपत्ती व्यवस्थापनाखाली मात्र आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन महसूल खात्याच्या आणि पर्यटन खात्याच्या अधिका-यांकडून नुकसानीचा आढावा घेतला जाईल. जे शॅक कायदेशीर पद्धतीने ठरविलेल्या जागेत उभे करण्यात आले, त्यांचा विचार नुकसान भरपाईसाठी केला जाईल. सीआरझेड उल्लंघन वगैरे ज्यांनी केले आहे, त्यांचा विषय सीआरझेड व पर्यटन खाते पाहून घेईल.मंत्री खंवटे म्हणाले की प्रत्यक्ष किती लाख रुपयांची हानी झाली आहे, ते मामलेदारांचे अहवाल आल्यानंतर कळून येईल. सर्वच शॅकना फटका बसलेला नाही. हरमल, मांद्रे, मोरजी, हणजुणा, कांदोळी, केरी अशा भागातील हानींविषयीचे अहवाल सरकारला मिळाले आहेत. सासष्टीतीलही काही भागांतील अहवाल मिळाले. दोन्ही जिल्हाधिका-यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाने स्थितीचा आढावा घेतला. मासेमारी करणा-या मच्छीमारांची हानी झाल्याचा अहवाल कुठूनच आलेला नाही. एक-दोन ठिकाणी किना-यांची धुप झाल्याची माहिती येत आहे.मंत्री खंवटे म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होऊ नये तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहे. सगळी व्यवस्था येत्या जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळेल. खाजन बांध आणि मानशी सुरक्षित राहायला हव्यात म्हणून त्यांना भेट देऊन अहवाल सादर करण्यास मामलेदारांना सांगितले आहे. जर कुणी अहवाल सादर केला नाही व मग बांध किंवा मानशी फुटल्या तर मग संबंधित अधिका-यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल.

टॅग्स :goaगोवाOckhi Cycloneओखी चक्रीवादळ