पणजी : राज्यात कांद्याचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून यापुढे रेशनवर प्रत्येकीतीन किलो कांद्याची विक्री करणार आहे. प्रत्येक रेशनधारकाला तीन किलो कांदे ३२ रुपये प्रति किलो दराने दिले जातील.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ही घोषणा केली. मंत्रिमंडळाने कांदा खरेदी व विक्रीचा निर्णय घेतला. नागरी पुरवठा खाते एकूण १०४५ मेट्रीक टन कांदा राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशनकडून (नाफेड) खरेदी करणार आहे. रुपये २६ हजार प्रति मेट्रीक टन या दराने ही खरेदी होईल. या शिवाय दोन हजार रुपये प्रति मेट्रीक टन वाहतूक खर्च लागू होईल. म्हणजेच २८ हजार रुपयेप्रति मेट्रीक टन दराने कांदा खरेदी करून ते ३२ हजार रुपये प्रति मेट्रीक टन याप्रमाणे सर्व रेशनधारकांना विकले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केसिनो १ नोव्हेंबरपासून सुरूराज्यातील तरंगते व अन्य केसिनो येत्या दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होतील असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. केसिनोंना सोशल डिस्टनसींग पाळण्यासह अन्य अटींचे पालन करावे लागेल. गेले सात-आठ महिने कोविड संकट काळात कसिनो बंद राहिले.दरम्यान, मध्य प्रदेशमधील कोळसा भूखंड हाताळण्यासाठी इच्छा प्रस्ताव मागितले जातील. त्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.