पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ व भाजपचे पदाधिकारी मिळून एकूण १७जण दोन दिवस गोव्याबाहेर असतील. मुख्यमंत्र्यांसह बहुतेक मंत्री शुक्रवारी रात्री कालिकत-केरळ येथे रवाना झाले. मुख्यमंत्री पार्सेकर हे मुंबईमार्गे केरळला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री डिसोझा व भाजपचे अन्य मंत्री रेल्वेने कालिकतला गेले आहेत. फक्त मंत्री अॅलिना साल्ढाणा व दिलीप परुळेकर जाऊ शकले नाहीत. थिवीचे आमदार किरण कांदोळकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, पदाधिकारी सदानंद शेट तानावडे, खासदार नरेंद्र सावईकर आदी सर्वजण केरळमध्ये पोहोचले. दोन दिवस बहुतेक मंत्री गोव्यात असणार नाहीत. कालिकत येथे भाजपची दोन दिवस राष्ट्रीय परिषद होणार असून त्या परिषदेत देशभरातील अनेक भाजप नेते सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर सोमवारी केरळहून थेट दिल्लीस जाण्याची शक्यता आहे. तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. (खास प्रतिनिधी)
अर्धे मंत्रिमंडळ गोव्याबाहेर
By admin | Published: September 24, 2016 2:43 AM