पणजी : अल्पावधीत गोव्यातील चोखंदळ वाचकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या दै. ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीने मंगळवारी आपला सहावा वर्धापनदिन थाटात साजरा केला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, उद्योजक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वागत समारंभास आवर्जून उपस्थित राहून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.‘लोकमत’चे संपादक राजू नायक व महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी सर्वांचे स्वागत केले. सकाळी कार्यालयात झालेल्या सत्यनारायण महापूजेचे यजमानपद ‘लोकमत’चे वितरण विभागाचे सागर लादे व प्रतीक्षा लादे यांनी केले.स्वागत सोहळ्यावेळी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार विश्वजित राणे, आमदार नरेश सावळ, आमदार पांडुरंग मडकईकर, झेडपी सदस्य जनिता मडकईकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार विष्णू वाघ, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे, आमदार लवू मामलेदार, एनआरआय आयुक्त विल्फ्रेड मिस्किता, महापौर शुभम चोडणकर, माजी मंत्री रामराव देसाई, उद्योगपती राजेश धेंपे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर, माजी गृहमंत्री रवी नाईक, भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे, राज्यसभा खासदार शांताराम नाईक, त्यांच्या पत्नी ‘हिस्टॅग’च्या अध्यक्षा बिना नाईक यांनी उपस्थिती लावली.भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर, भाजपचे प्रदेश महामंत्री सतीश धोंड, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रमुख देवानंद नाईक, सरचिटणीस अविनाश भोसले, अॅड. सुहास वळवईकर उपस्थित राहिले.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस, माजी आमदार प्रताप गावस, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, माजी आमदार दामू नाईक, माजी आमदार धर्मा चोडणकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, (पान २ वर)
‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Published: April 22, 2015 1:44 AM