शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘म्हापसा अर्बन’ची सुनावणी सोमवारी

By admin | Published: September 12, 2015 2:10 AM

पणजी : म्हापसा अर्बन बँकेवर घातलेल्या निर्बंध प्रकरणी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या

पणजी : म्हापसा अर्बन बँकेवर घातलेल्या निर्बंध प्रकरणी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती एफ. एम. रेईश व न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. खातेधारकाला १ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही, असे निर्बंध रिझर्व्ह बँकेने घातलेले आहेत. म्हापसा अर्बनतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे पगारदार वर्गासमोरही समस्या निर्माण झाली आहे. अनेकांचे पगार बँकेत येतात त्यांची अडचण झालेली आहे याकडे लक्ष वेधले. बँक सुस्थितीत आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न चालू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या बँकेत विलीनीकरणाची सूचना होती रिझर्व्ह बँकेच्या वतीने युक्तिवाद करताना वकील नितीन सरदेसाई यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की, २0१२ पासून रिझर्व्ह बँक म्हापसा अर्बनशी नियमितपणे बैठका घेत आहे. आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नसेल तर सुस्थितीत असलेल्या एखाद्या मोठ्या बँकेत म्हापसा अर्बनचे विलीनीकरण करावे, असेही अनेकदा सुचविले होते. रिझर्व्ह बँकेने नियमानुसारच हे निर्बंध घातलेले आहेत आणि बँकेची परिस्थिती सुधारेपर्यंत निर्बंध कायम ठेवणे गरजेचे आहे. बँकेला मोकळे सोडून चालणार नाही, असा दावाही त्यांनी केला. कर्जवसुलीचे प्रमाण काय? किती ठेवी स्वीकारल्या आणि किती कर्ज दिले यावर बँकेचे आरोग्य ठरत असते. त्यादृष्टिकोनातून पाहिल्यास बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)