मडगाव : गेल्या वर्षी संपूर्ण गोव्याला हादरावून सोडणाऱ्या काणकोण येथील रुबी इमारत दुर्घटनेची सुनावणी गुरुवार, दि. १६ एप्रिलपासून पणजीचे खास न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणीस येणार असून ८ सरकारी अधिकाऱ्यांसह एकूण ११ आरोपी न्यायालयात उपस्थित राहाणार आहेत. ४ जानेवारी २0१४ रोजी झालेल्या या दुर्घटनेत ३१ कामगारांचा मृत्यू आला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्यासह एकूण ११ आरोपींवर क्राईम ब्रँचने आरोपपत्र दाखल केले होते. यात बिल्डर प्रदीपसिंग बिरींग, जगदीप सैगल याच्यासह इमारत कंत्राटदार विश्वास देसाई याचा समावेश आहे. या प्रकरणात क्राईम ब्रँचने आरोपींविरुद्ध २६00 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून १८५ साक्षीदारांची सूची यासोबत जोडली आहे. (प्रतिनिधी)
‘रुबी’प्रकरणी आजपासून सुनावणी
By admin | Published: April 16, 2015 1:24 AM