पणजी : राज्यातील सर्व रस्त्यांवर येत्या १ एप्रिलपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली जाईल, असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. राज्य रस्ता सुरक्षा धोरणाचा मसुदा तयार झाला असून तो मुख्य सचिवांसह विविध सरकारी अधिकाऱ्यांकडे वितरित केला गेला आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या राष्ट्रीय महामार्गांवरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती केली जाते. तथापि, वाढते अपघात व त्यात दुचाकीस्वारांचे जाणारे बळी लक्षात घेऊन राज्यातील सर्व शहरांतील व गावांतील रस्त्यांवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने २०२० पर्यंत राज्यातील वाहन अपघातांची संख्या ५० टक्क्यांनी खाली आणण्याचे लक्ष्य आम्हाला ठरवून दिले आहे. गोव्याने अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून कृती आराखडाही तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली आहे, असे देसाई यांनी सांगितले. १८९ दुचाकीस्वार ठार गेल्या वर्षी एकूण १८९ दुचाकीस्वारांचे अपघातांत बळी गेले. त्यापैकी १३१ दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नव्हते. ग्रामीण भागातील रस्त्यांवरही अपघात होऊन दुचाकीस्वारांचे बळी जातात, असे आढळून येते. गेल्या ७ रोजी एक दिवसाची कारवाई मोहीम वाहतूक खात्याकडून राबविली गेली. त्या वेळी एकूण ६८७ (पान २ वर)
१ एप्रिलपासून हेल्मेटसक्ती
By admin | Published: March 12, 2015 1:52 AM