नारायण गावस -
पणजी: गोवा सरकारने जुने गोवे येथील गोयंचो सायब शव प्रदर्शनासाठी नेमणूक केलेल्या उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी बुधवारी चर्च परिसरात पाहणी करुन पूर्ण आढावा घेतला. सरकारने जुने गोवा सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन २०२४ (गोएंचो सायब) साठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकारी समन्वय समिती नियुक्त केली आहे आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ४० सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
जुने गोवा येथील प्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन २०२४ हा शव प्रदर्शन धार्मिक साेहळा यंदा २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. या शवप्रर्दशनाला देश विदेशातील लाखाे भाविक तसेच पर्यटक येत असतात त्यामुळे जुने गाेवा परिसरात वाहन पार्किग व्यवस्था, भाविकांना राहण्याची व्यवस्था तसेच इतर सुरक्षतेची कडेकाेड तयारी करावी लागते. या अगाेदर २०१४ : २०१५ मध्ये हे शवप्रदर्शन झाले होते.
बुधवारी सकाळी सरकारने नेमणूक केलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांनी ओल्ड गाेवा चर्च परिसरात वाहनांसाठी पार्किगची व्यवस्था जाग्याची पाहणी केली तसेच या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या भाविकांना कशा प्रकारे येथे यायला सुलभ पडेल याची चर्चा झाली. अजून या शव प्रदर्शनाला ८ महिने आहेत तरी या समितेने आतापासून पाहणी तसेच बैठक घेण्यास सुरवात केली आहे. हा महाेत्सव १० वर्षांनी एकदा येत असल्याने दिवसाला लाखो लाेक या जुने गाेव्यातील शव प्रदर्शनाला भेट देत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षतेचे सरकारसमाेर मोठे आवाहन असते. यासाठी अगोदरच याचे नियोजन करावे लागते.