पणजी: हाय प्रोफाईल सेक्स रेकेट प्रकरणात आरोपपत्र दाखल न करता दडपून टाकत असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत केला. पणजीतील ताज विवांता या पंचतारांकीत हॉटेलमध्ये उघडकीस आणलेल्या एका हाय प्रोफाईल प्रकरणाचा पुराव्यासह उल्लेख करून त्यांनी स्पष्टीकरण मागितले. गोव्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून उघडकीस आणलेली वेश्याव्यवसाय प्रकरणांची माहिती हळर्णकर यांनी विचारली होती. २०१७ मध्ये एकूण २९ प्रकरणे असल्याचे उत्तर देण्यात आले. या २९ प्रकरणा पैकी एकाही प्रकरणात आरोपीला दोषी घोषीत करण्यात आलेले नाही तर पैकी ४ प्रकरणात आरोपपत्रही दाखल न करता गुन्हा मागे घेण्यात आलयाची माहिती देण्यात आली. त्यापैकी एक प्रकरण जे हाय प्रोफाईल म्हणून आमदाराने उल्लेख करण्यात आले होते ते हॉटेल विवांतातील प्रकरणात का आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. गृहखाते सांबाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे नेतृत्व करणारे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी साक्षिदार साक्षी देण्यासाठी न्यायालयात येत नसल्यामुळे आरोपी सुटतात, तसेच काही प्रकरणात पुरावेच सापडत नाहीत आणि त्यामुळे संशयितांना फायदा मिळतो असे सांगितले. परंतु ज्या प्रकरणात स्वत: पोलीसच साक्षीदार होते तिथे साक्षिदार अनुपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. विवांता हॉटेलमधील प्रकरणात बोगस गिºहायिक बनून गेलेला माणूस हा पोलीसच होता आणि हा भक्कम पुरावा होता. या प्रकरणात आरोपपत्रच दाखल करण्यात आलेले नाही तर साक्षिदाराचा प्रश्न कुठे उद्भवतो असा प्रश्नही त्यांनी केला. तरूण तेजपाल सारख्या माणसांवर स्वेच्छा नोंद घेऊन दाखल घेऊन कारवाई केली जाते आणि पोलिसांनी पुराव्यांसह पकडलेले संशयित न्यायालयात सुटतात याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी केला. आपल्याला या प्रकरणात तूर्त फारशी माहिती नाही, परंतु या प्रकरणात चौकशी करता येईल असे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.
हाय प्रोफाईल सेक्स प्रकरणे का दडपता? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 8:43 PM