पणजी : आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी व बीएलओंनी मिळून घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यास सोमवारी आरंभ केला. एखादा कोरोना संशयीत असल्यासारखी लक्षणो दिसतात का या दृष्टीकोनातून हे सव्रेक्षण केले जात आहे.
अंगणवाडी कर्मचारी, शिक्षिका, सरकारी कर्मचारी यांचा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. प्रत्येक घरी जाऊन व कुटूंब प्रमुख घरी असल्यास कुटूंब प्रमुखाला भेटून पाच प्रश्न विचारले जातात. घरी कुणाला थंडी, ताप आहे काय, गेल्या फेब्रुवारीपासून आतार्पयत कुणी गोव्याबाहर प्रवास करून आलेले आहे काय, घरात कुणाला मधूमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रस आहे काय वगैरे माहिती जाणून घेतली जाते. ती मोबाईल किंवा लॅपटॉपवरील अॅपमध्ये भरली जाते. काही ठिकाणी सव्रेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेंज मिळत नव्हती व त्यामुळे त्यांनी अॅपचा वापर केला नाही, आपण सध्या माहिती वहीवर लिहून घेतो व मग अॅपवर टाकतो असे कर्मचाऱ्यांनी लोकांना सांगितले.
एक-दोन ठिकाणी सव्रेक्षण करणा:या कर्मचाऱ्यांना कडक उन्हामुळे घेरी देखील आली. मात्र असे प्रकार जास्त घडले नाहीत. एकूण सर्वेक्षणाचे काम चांगल्या प्रकारेच पार पडल्याचे आरोग्य खात्याच्या सुत्रंनी सांगितले. आणखी दोन दिवस हे सर्वेक्षण काम चालेल. राज्यातील सर्व घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर सरकारला अरोग्यविषयक डेटा उपलब्ध होईल. या डेटाचा वापर करून गोव्याला कोरानापासून पूर्ण मुक्ती देण्यासाठी सरकार पाऊले उचलू शकेल. कोणत्या भागातील कोणत्या व्यक्तींची कोरोना चाचणी करणो गरजेचे आहे याचा अंदाज सरकारला येईल. देशातील काही जिल्ह्यांमध्ये असे सर्वेक्षण यापूर्वी झालेले आहे.