पणजी - अविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर (महाराष्ट)तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राष्टीय पातळीवर ‘बेस्ट टिचर’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, चित्रकार संजय हरमलकर, आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार संजय पवार, आविष्कार फाउंडेशन (गोवा प्रेदश) अध्यक्ष प्रदीप नाईक, उज्वला सातपूते, सारंग पाटील हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पणजीतील कला व संस्कृती संचालनालयच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या वेळी गोवा, महाराष्ट, कर्नाटक, आसाम, उत्तरप्रदेश, हरियाणा या सहा राज्यातील शिक्षकांना रमाकांत खलप यांच्या हस्ते राष्टीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रमाकांत खलप म्हणाले, आपला देश हा संस्कृती व विचारधाराने नटलेला प्रदेश. पौराणिक काळात देशात जात, धर्म, वर्णावर विद्यादान दिले जायचे. त्यामुळे काहींनी स्वत:ची जात लपवून शिक्षण घेतले. एकलव्य, कर्ण यासारख्यांनी हे अनुभवले. शिक्षकांनी आपल्.ा संस्कृतीचे आकलन करून त्यातील केवळ चांगले विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजूवावेत.
ते म्हणाले, मुगलानी देशावर आक्रमण केले होते, हे सत्य आहे. दिल्लीत मुगलानी लाल किल्ला बांधला म्हणून तो आपण मोडणार का? त्याच किल्ल्यावरून आतापर्यंत अनेक पतंप्रधानांची भाषणे झाली आहेत. जगतील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील ‘ताजमहाल’. हे एका मुस्लिम व्यक्तीने स्वत:च्या प्रेयसीसाठी बांधला. काहीजण ते पाडण्यात यावे, अशी विधाने करतात. हे किती योग्य? अशावेळी शिक्षकांची जबाबदारी वाढते की देशाला एकसंघ ठेवावे. शिक्षकांनी स्वत:ला प्रश्न विचारावा की मी कोण? ‘टिचर’ की ‘चिटर’. काही शिक्षकांमुळे शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. जोपर्यंत याचे उत्तर मिळत नाही, तोवर असे प्रश्न विचारले जातील. शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर शहराचे योगदान खूप मोठे असून याचा पाया छत्रपती शाहू महाराज यांनी घातला. जुन्या व नव्या पद्धतीमधील काय चूक व काय बरोरबर हे प्रत्येकाने निवडावे.
दरम्यान, गुणवंत शिक्षकांचा या वेळी सन्मान केला गेला. यात संजय दिवकर, निळू जल्मी, सरीत डफळ, नवशात सिद्दीकी, संदीप किर्वे, डॉ. अशोक कापटा, दिलीप पाटील, अरविंद किल्लेदार, सोनाली सुर्यवंशी, सलीम जमादार, संजय पवार, आनंदा गायकवाड, कमल जगताप, लिपिका बरुवा, जुनू राजखिवा, बाळासाहेब कोलते, प्रा. गणपत करीकंटे, धनंजय रोटे, अर्चना मोरे, ओमबीरसिंह ठाकरार, शेख कैसर, प्रकाश केंद्रे, सौरव पाटील, संदीप सानब, मुग्रेद्र दुबानी, सुनील राठोड विलास माळी, अक्षय पाटील, शरद सुर्यवंशी या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मी सहा महिने मरत होतो - खलप
एका कार्यक्रमात मी महाभारतातील एकलव्य व कर्ण यांना त्यांच्या गुरुकडून मिळालेली वागणूक ही अमानुष्य व अमानवी कृत्य असे संबोधले होते. तेव्हा वर्तमानपत्रातून मला टीकेचा धनी बनविण्यात आला. त्या भाषणानंतर सतत मला फोनवरून धमक्या मिळू लागल्या. तुम्ही हिंदुमध्ये श्रद्धेचे स्थान असणाºया गुरुबद्दल अपमानास्पद भाष्य केले आहे. यावरून मला लक्ष्य करण्यात आले. सुदैवाने माझ्यावर गोळी झाडण्यात आली नाही. ‘पानसरे एकदाच मेले’, ‘गौरीलंकेश एकदाच मेले’, ‘दाभोलकर एकदाच मेले’... मात्र त्या वेळी मी त्या वेळी सहा महिने मरत राहिलो, असा अनुभव खलप यांनी कार्यक्रमात व्यक्त केला.