पणजी - वर्षाअखेरीस निरोप देण्यासाठी आणि ख्रिसमसचे औचित्य साधून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणा-या पर्यटकांकडून राजधानी पणजीतील हॉटेल बुकिंग फुल्ल झालेली आहेत. असेच चित्र किनारी भागातील हॉटेलचे बुकिंग एक महिना अगोदरच फुल्ल झाल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आवठडयात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबर नाताळाच्या सुट्टय़ा घालविण्याचा बेत आखून देशातील अनेक राज्यातून पर्यटक गोव्यात दाखल होतात. यावर्षीही महिनाभर अगोदरच शेवटच्या आठवडयातील सात दिवसांसाठी राजधानी पणजीतील हॉटेलच्या रुम बुक झाल्या आहेत. या महिन्यातील पहिल्या तीन आवठडय़ात खोल्यांसाठी जे एक दिवसाचे भाडे आकारले जात होते, त्यात कपात केली जात होती. मात्र, शेवटच्या आठवडय़ासाठी ऑनलाईन, त्याचप्रमाणो मित्रपरिवार, एजंट यांच्यामार्फत हॉटेलच्या रुम बुक करण्यात आल्या आहेत. ऑनलाईनवर सर्व दर, माहिती लोकेशन पहायला मिळत असल्याने लोकही अशा पद्धतीने बुकिंग करण्यात अजिबात गैर मानत नाहीत.
ऑनलाईन बुकिंगवर अनेक कंपन्यांतर्फेच हॉटेलवाले दरामध्ये सुट देत आहेत. अनेकांचे एका रात्रीचे राहण्याचे ठरलेला दर आणि कपात सुट दिलेला दर याची माहितीच ऑनलाईन मिळत असल्याने लोकांची पसंतीही आणि चॉईस करण्यास संधीही एकाच क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे अशा बुकिंग करणो सोयिचे झाल्याने अनेक राज्यातील एजंटच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला आहे. जो एजंट हॉटेल मिळवून त्याला पर्यटक राहणा:या दिवसाप्रमाणो किमान सहाशे रुपये मिळत होते, पण आता ऑनलाईन बुकिंगचा त्यांना फटका बसला आहे.
कळंगुट येथील हॉटेल रिवासा रिसॉर्टचे मालक अरविंद देसाई यांनी सांगितले की, वर्षाच्या शेवटच्या आठवडय़ात येणारा पर्यटक हा हौशी असतो. या काळात रुमचे भाडे दुप्पट होते. आता जीएसटीसह ते बिल अदा केले जाणार आहे. इतर हॉटेलच्याही रुमचे दर वाढलेले असतील. सध्या ऑनलाईन बुकिंगचेच पर्यटक अधिक असतात, शेवटचा आठवडय़ातील आमचे बुकिंग अगोदरच फुल्ल झाले आहे. किनारी भागातील चित्र यापेक्षा वेगळे नसेल, असेही देसाई म्हणाले.
वर्षाचा शेवटचा आठवडा फुल्लच!गोवा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडय़ात बुकिंक फुल्लच असते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये 8क् टक्के बुकिंग ऑनलाईनसाठी ठेवतो. त्यात आता विविध कंपन्या ऑनलाईन हॉटेल बुकिंग उपलब्ध करून देऊ लागल्या आहेत. त्यामुळे महिनाभर अगोदरच बुकिंग होत आहे. रुम आम्ही खाली ठेवतो, अचानक आलेल्या पर्यटकांसाठी त्या दिल्या जातात. मात्र, अशा गर्दीत पर्यटकांनी येणो आणि हॉटेल शोधणो जरा जिकरीचे होते, कारण त्यांना खाली रुम मिळणो फारच अवघड होऊन जाते. त्यामुळे लोकही ऑनलाईन बुकिंगचाच वापर अधिक करतात. त्यामुळे शेवटचा आठवडय़ात बुकिंग फुल्ल असल्याचे चित्र राज्यातील किनारी भागातील हॉटेलमध्ये सर्वत्र दिसते.