लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील कदंब महामंडळाच्या ताफ्यात ५२७ बस आहेत. पण, यातील काही बस या जुन्या झाल्याने तसेच मोडकळीस आल्याने बंद आहेत. अनेक ठिकाणी नव्या बसची गरज आहे. बहुतांश ग्रामीण भागात जुन्या मोडकळीस आलेल्या बस प्रवास करत आहेत.
कदंबा महामंडळाकडे ५२७ बस आहेत. यातील अनेक बस या जुन्या असल्याने भंगार अड्ड्यात पडून आहे. त्यामुळे महामंडळाने आता विजेवर चालणाऱ्या बस सुरू केल्या आहेत. तसेच आता माजी बस योजनेंर्तगत काही बस घेतल्या आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बसची आवश्यकता आहे. काही गावांमध्ये अजूनही जुन्या मोडकळीस आलेल्या बस जात असल्याने प्रवाशाचे हाल होतात.
अनेक बसेस जुन्या झाल्याने प्रवाशांचे होतात हाल
कदंबा महामंडळ हे गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे. काही बसला २० ते २५ वर्षे झाली आहेत. खूप जुन्या झाल्याने चालवताना चालकांचे हाल होतात. या बसमधून काळा धूर निघतो. तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर इंजिन नादुरुस्तीमळे बऱ्याच वेळा बंद पडतात. गेल्या वर्षभरात जवळपास ६८२ वेळा कदंबा बसचे ब्रेक डाऊन इंजिन बिघाडामुळे बंद पडल्या आहेत. विविध ठिकाणी कदंबा बस बंद पडल्याच्या तक्रारी ऐकायला येतात. यामुळे कामावर जाणाऱ्या तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होतात.
महामंडळाकडे विजेवर चालणाऱ्या बस
कदंबा महामंडळाने आता विजेवरील चालणाऱ्याा बस घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास ५० विजेवर चालणाऱ्या बस दाखल झाल्या आहेत. तर आणखी १०० येणार आहेत.
सध्या ज्या बस आहेत त्या बहुतांश मुख्य शहरातील भागातील रस्त्यावर धावत आहेत. त्याची लांबी व रुंदी जास्त असल्याने त्या ग्रामीण भागातील रस्त्यावर प्रवास करू शकत नाही. आता कमी लांबी व उंचीच्या बस दाखल झाल्यावर त्या राज्यातील ग्रामीण भागात प्रवास करणार आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे.
कदंबा महामंडळ आता हळूहळू सर्व बस विजेवर चालणाऱ्या घेणार आहे जुन्या बस बंद केल्या जाणार आहेत. आताही जुन्या बस प्रवसासाठी पाठविल्या जात नाही. - डेरिक नेटो, व्यवस्थापकीय संचालक, कदंबा महामंडळ.