किती आमदार करोडपती?; पाहा, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस संस्थेचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:40 AM2022-03-16T08:40:35+5:302022-03-16T08:41:25+5:30
गोवा विधानसभेच्या निवडणुकांत विजयी झालेल्या ४० उमेदवारांपैकी १६ म्हणजे ४० टक्के जणांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपशील निवडणूक आयोगाला आधीच सादर केला होता.
गोवा विधानसभेच्या निवडणुकांत विजयी झालेल्या ४० उमेदवारांपैकी १६ म्हणजे ४० टक्के जणांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपशील निवडणूक आयोगाला आधीच सादर केला होता. यंदा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचा आमदार वगळता इतर सर्व पक्ष व अपक्ष असे ९८ टक्के आमदार करोडपती आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती तपासून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे.
गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची पक्षनिहाय स्थिती-
पक्ष गुन्हे दाखल गंभीर गुन्हे
असलेले दाखल
आमदार असलेले
गोवा फॉरवर्ड पार्टी १००% ०%
काँग्रेस ६४% ५५%
मगोप ५०% ५०%
भाजप ३५% ३०%
शिक्षण-
१३ जणांचे (३३ टक्के) ८ वी ते १२वीपर्यंतच शिक्षण
२१ आमदार (५३ टक्के) पदवीधर किंवा त्याहूनही उच्चशिक्षित
६ आमदारांनी डिप्लोमा पूर्ण केला.