मडगाव : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षा बुधवार दि. १ मार्चपासून सुरू होणार असून त्या २१ मार्चपर्यंत चालणार आहेत. सकाळी दहा वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. गोव्यातील विविध केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येतील.८ फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांना सुरुवात झालेली आहे. शालान्त मंडळाने बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १ मार्चला इंग्रजी विषयाने परीक्षेची सुरुवात होणार आहे. ३ मार्चला फिजिक्स, इतिहास व अकाउंटन्सी या विषयांची परीक्षा होणार आहे. ६ मार्चला केमिस्ट्री व बिझनेस स्टडी, ८ मार्चला इकॉनॉमिक्स, ९ मार्चला बायोलॉजी, गियोलॉजी, १० मार्चला हिंदी, १५ मार्चला गणित, पॉलिटिकल सायन्स, १६ मार्चला भूगोल, १७ मार्चला कोकणी, १८ मार्चला सेक्रेटरियल प्रॅक्टिस, २० मार्चला कॉपरेशन, लॉजिक, संगणक, २१ मार्चला सोशोलॉजी तर २२ मार्चला मराठी विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे.दरम्यान, दहावीची परीक्षा ३१ मार्चला सुरू होण्याची शक्यता असून सात एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे. गोवा शालान्त मंडळाने दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अजून जाहीर केलेले नाही. (प्रतिनिधी)
बारावीची परीक्षा १ मार्च; दहावीची ३१ मार्चपासून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 1:22 AM