पणजी : गोव्यात बारावीची परीक्षा उद्या २८ पासून सुरु होत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसायिक शाखेत मिळून १७८८६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थी मुलींची संख्या जास्त आहे. २६ मार्चपर्यंत या परीक्षा चालतील. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांच्याशी संपर्क साधला असता परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कला शाखेतून४३३२, वाणिज्य शाखेत ५३४४, विज्ञान शाखेत ५२६५ तर व्यावसायिक शाखेत २९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एक़ूण ८५७४ मुलगे आणि ९३१२ मुली आहेत. कला शाखेत जास्त मुली आहेत.उद्या पहिल्या दिवशी सकाळी १0 ते दु. १२.३0 अकौंटंसी, फिजिक्स, इतिहास, १ मार्च- सकाळी १0 ते १ इंग्रजी, मराठी ६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 केमिस्ट्री, बिझनेस स्टडी, ८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 इकोनोमिक्स, ११ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 - जीवशास्र (बायोलॉजी), भूगर्भशास्र (जिओलॉजी), १३ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 गणित, पॉलिटिकल सायन्स, १५ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 सायकॉलॉजी, कूकरी, १६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 हिंदी व्दितीय भाषा, पोर्तुगीज १८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 बँकिंग. (लॉजिक, कम्प्युटर सायन्स, को आपॅरेशन), १९ मार्च-इंग्रजी व्दितीय भाषा, कोकणी, ऊर्दू, संस्कृत, पेंटिंग, २0 मार्च-सकाळी १0 ते ११.३0 आॅटोमोबाइल, आयटी, हेल्थ, रीटेल, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, ब्युटी अॅण्ड वेलनेस, अॅपरेल, कन्स्ट्रक्शन, अॅग्रीकल्चर, फिजिकल एज्युकेशन, मिडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट, बँकिं ग अॅण्ड इन्शुरन्स, टेलिकम्युनिकेशन्स व लॉजिस्टिक (व्यावसायिक विभाग), २२ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सेक्रेटरियल प्रॅक्टिस, २३ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 -भूगोल(जिओग्राफी), २५ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सोशिओलॉजी, २६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 मराठी व्दितीय भाषा, फ्रेंच या विषयाच्या परीक्षा होतील.
गोव्यात बारावीची परीक्षा उद्यापासून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 7:56 PM