शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

'मी भाजप सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होतो', उपसभापतींचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 7:41 PM

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मंत्री झालो नाही.

ठळक मुद्देआमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मंत्री झालो नाही. पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करणारे गोव्यातील पहिले आमदार म्हणजे इजिदोर फर्नांडीस आहेत

पणजी : भाजप सरकार पाडण्यासाठी हालचाली मीही करीत होतो, असे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आणि आता गोवा विधानसभेचे उपसभापती बनलेले इजिदोर फर्नांडीस यांनी विधानसभेत सांगितले. काँग्रेसमधून जे १० आमदार भाजपात दाखल झाले होते, त्यात फर्नांडीस यांचा समावेश होता. गुरूवारी विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यांना उपसभापतीच्या पदावर बसविण्यात आल्यानंतर सभागृहाच्या सदस्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ते विरोधात असताना सरकार पाडण्यासाठी नियोजन करीत होते असे सांगितले.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विरोधात अधिक बसलो. सरकारपक्षात असतानाही आमदार झालो तरीही मंत्री झालो नाही. एकदा तर अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो, परंतु तेव्हाही मंत्री बनू शकलो नाही. मुख्यमंत्री बनलेले सर्वजण त्यापूर्वी केव्हा तरी आपल्या घरी येवून गेलेले होते. परंतु, मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी आपल्याला मंत्री केले नाही. तुमचे नाव शेवटच्या क्षणी यादीतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सरकारातही आपल्याला मंत्री बनविण्यात आले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ढवळीकरांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता.

पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करणारे गोव्यातील पहिले आमदार म्हणजे इजिदोर फर्नांडीस आहेत. २००५ साली जेव्हा काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले सुदिन ढवळीकर यांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती फर्नांडीस यांनी बोलताना दिली. ढवळीकर यांच्यामते ही फर्नांडीस यांची मोठी चूक होती. 

टॅग्स :goaगोवा