लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : पेडणे मतदारसंघातून आगामी २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी प्रमुख दावेदार आहे. तिकीट मिळो किंवा न मिळो, लढणारच, असा पुनरुच्चार माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान केला. स्थानिक पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पक्षाचे तिकीट मिळेल की नाही, ते येणारा काळ ठरवेल, असे सांगितले.
भाजपने २०२२ च्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री आजगावकर यांना पेडणे मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी नाकारली होती. त्याऐवजी त्यांना मडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आदेश दिला होती. आजगावकर यांनी तेथे निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला, मगो पक्षातून आलेल्या प्रवीण आर्लेकर यांना पेडणे मतदारसंघाची उमेदवारी भाजपने दिली. ते तेथून विजयी झाले. तेव्हापासून आजगावकर आणि आर्लेकर यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
आजगावकर यांनी २०२७ च्या निवडणुकीत उमेदवारी कुठल्या पक्षाची, हे स्पष्ट केले नाही. मात्र येणाऱ्या काळात योग्य तोच उमेदवारी आपल्याला मिळणार असून आपण भाजपचा सच्चासेवक असल्याचे ते म्हणाले. पेडणे मतदारसंघातून आतापर्यंतचा निवडून आलेला एकही उमेदवार मतदारसंघातील स्थानिक नाही.