इफ्फीचा दर्जा घसरला, काँग्रेसची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:04 PM2018-11-21T20:04:55+5:302018-11-21T20:05:28+5:30

इफ्फीसाठी गोवा हे कायम स्थळ म्हणून जाहीर झाले असले तरी यंदाची इफ्फी पाहता दर्जा घसरल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केली आहे.

IFFI status dropped, Congress criticized | इफ्फीचा दर्जा घसरला, काँग्रेसची टीका 

इफ्फीचा दर्जा घसरला, काँग्रेसची टीका 

Next

पणजी -  इफ्फीसाठी गोवा हे कायम स्थळ म्हणून जाहीर झाले असले तरी यंदाची इफ्फी पाहता दर्जा घसरल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केली आहे. राज्यात सरकार अस्तित्त्वात नाही त्याचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. सरकार अस्तित्त्वातच नसल्यासारखी स्थिती आहे. इफ्फीच्या 

उद्घाटनाच्या प्रवेशिका मिळविण्यासाठी एरव्ही उड्या पडायच्या परंतु यंदा लोकही पास घेण्यासाठी पुढे आले नाहीत, अशी टीका चोडणकर यांनी केली. 

 ‘भाजप कोअर टीमवर गुन्हे नोंदवा’

दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी अखेर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अंथरुणाला खिळले असल्याचे तसेच जीवाशी संघर्ष करीत असल्याचे मान्य केले असल्याचे चोडणकर म्हणाले. एवढे दिवस आम्ही हेच म्हणत होतो परंतु भाजप नेते सर्वांना पर्रीकरांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत होते. भाजपच्या कोअर टीमने आजवर चुकीची माहिती दिली. पर्रीकर बरे आहेत असे सांगणाºया कोअर कमिटीतील सदस्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करा, अशी मागणी चोडणकर यांनी केली. 

राजन घाटे यांच्या उपोषणाला सहा दिवस लोटले असले तरी कोणीही सरकारी अधिकारी किंवा सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेला नाही यावरुन न्यायासाठी लढणाºयांबाबत सरकारची असलेली अनास्था दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. 

सुभाष शिरोडकर तसेच दयानंद सोपटे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका मगोपने हायकोर्टात सादर केली आहे. याबाबतीत काँग्रेस गप्प का, असा सवाल केला असता चोडणकर म्हणाले की, ‘कायदेशीर सल्लामसलत चालू असून याबाबत वेगवेगळी मतें मांडण्यात येत असल्याने तूर्त निर्णय झालेला नाही.’

 ‘सामन्यावर बहिष्कार नाही’ 

दरम्यान, फातोर्डा मैदानावर गेल्या ८ रोजी फुटबॉल सामन्याच्यावेळी लेस्टर डिसोझा या हणजुण येथील युवकाला तसेच त्याच्या माता, पित्याला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ युवा काँग्रेसने आज होणाºया फुटबॉल सामन्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन याआधी केले होते. परंतु हे आवाहन आता मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणात संबंधित दोन पोलिस शिपायांविरु ध्द खात्यांतर्गत चौकशी सुरु झालेली आहे तसेच अन्य मागण्याही मान्य झालेल्या आहेत त्यामुळे हे आवाहन मागे घेत असल्याचे युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले. परंतु त्याचबरोबर लेस्टर व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेस्तोवर अखेरपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

Web Title: IFFI status dropped, Congress criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.