वासुदेव पागी, पणजी: आसगाव येथील गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक जसपाल सिंग अडचणीत आले असताना पोलीस महानिरीक्षक ओम वीर सिंग तातडीने गोव्यात बोलवण्यात आले आहे. महा निरीक्षक ओमवीर सिंग हे रजेवर होते आणि त्यामुळे ते गोव्याबाहेर होते. या घडामोडीमुळे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचा ताबा ओमविर सिंह यांच्याकडे सोपवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आसगाव प्रकरणामुळे निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या कठीण जबानीमुळे अडचणीत आलेले महासंचालक जसपाल सिंग सध्या वादाच्या घेऱ्यात सापडले आहेत. जसपाल सिंग यांचा या घटनेची असलेल्या संबंधामुळे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना या प्रकरणाचा विरोधक विधानसभेत मुख्य मुद्दा बनवणे सरकारवर हल्लाबोल करणार हे निश्चित असल्यामुळे या प्रकरणात कोणतीही जोखीम न घेण्याचा सरकारचाही पवित्रा दिसत आहे.