शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे नायजेरियन अमली पदार्थाच्या व्यवसायात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 8:18 PM

नायजेरियन नागरिकांची वाढती गुन्हेगारी प्रकरणे कळंगुट पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चालू वर्षात नायजेरियन नागरीक बेकायदेशीरपणे अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतल्याची ८ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

म्हापसा : नायजेरियन नागरिकांची वाढती गुन्हेगारी प्रकरणे कळंगुट पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चालू वर्षात नायजेरियन नागरीक बेकायदेशीरपणे अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतल्याची ८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्या सर्वांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील वैशिष्ठ म्हणजे नोंद करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यांतील नायजेरियनांचे बेकायदेशीरपणे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी एका नायजेरियन नागरिकाकडून १ लाख  ६० हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 

चालू वर्षात कळंगुट पोलिसांनी नायजेरियन नागरिकां विरोधात  एकूण ८ अमली पदार्थ प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत. या सर्व प्रकारात त्यांच्याकडून अंदाजीत ५ लाखांहून जास्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यातील चार गुन्हे गत पर्यटन मौसमात नोंद करण्यात आले होते तर राहिलेले चार गुन्हे नवीन पर्यटन मौसमाला सुरुवात झाल्यानंतर  नोव्हेंबर महिन्यात नोंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बहुतेक नायजेरियनांचे देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.  

चालू महिन्यात बेकायदेशीर वास्तव्य तसेच अमली पदार्थाची एकूण ४ प्रकरणे कळंगुट पोलिसांनी नोंद केली आहेत. यात अंदाजीत २ लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी क्रिस ओविरीयाकडून १० हजार रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलेला तसेच त्याच्या विरोधात बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन राहत असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला.  

१२ नोव्हेंबर रोजी मिकेल ओकोरो तसेच अदेलेके खलीद या दोघांकडून २० हजार रुपये किंमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आलेला. त्यांची चौकशी केली असता देशात वास्तव्यासाठी लागणारी योग्य कागदपत्रे अर्थात पासपोर्ट व व्हिजा त्यांच्याजवळ नसल्याचे आढळून आले. या दोन्ही प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले होते. सोमवारी क्रिस्तेफोर ओनीगबो या नायजेरियन नागरिकाला १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या अमली पदार्थासहित ताब्यात घेण्यात आले. केलेल्या कारवाई दरम्यान त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे एलएसडी पेपर्स तसेच ४० हजार रुपये किंमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आला. कळंगुट सर्कलजवळ सदर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली दुचाकी तसेच मोबाईल फोन सुद्धा ताब्यात घेण्यात आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी कळंगुट पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. अशी माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. 

२५ नोव्हेंबर रोजी एका अपघातात सापडलेल्या दोघा  नायजेरियांना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात मायकल ओकाफो तसेच जॉन ओकाफो यांना ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या एकूण प्रकरणावरून बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन असलेले नायजेरियन नागरिक अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यवसायात गुंतले असलयाचे दिसून आले आहे. 

टॅग्स :goaगोवा