शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मी भाभासूमंसोबत पण नव्या संघात नाही - लेले

By admin | Published: September 01, 2016 9:46 PM

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज्ञाधारक स्वयंसेवक आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 1 - मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज्ञाधारक स्वयंसेवक आहे. मी पूर्णपणे भारतीय भाषा सुरक्षा मंचसोबत सक्रियपणे होतो व राहीन. मात्र प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बंडखोरांच्या नव्या संघासोबत मी नाही, असे रत्नाकर लेले यांनी गुरुवारी येथे सांगितले.लोकमतशी बोलताना लेले म्हणाले, की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हायला हवे व इंग्रजी शाळांचे अनुदान बंद व्हायला हवे म्हणून भाषा सुरक्षा मंचाने जी चळवळ सुरू केली आहे, त्या चळवळीला व त्या विषयाला माझा पाठिंबा आहे. मात्र नव्या राजकीय पक्षाशी मी स्वत:ला जोडून घेणार नाही. तसेच गोव्यापुरताच म्हणून जो नवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंडखोरांनी स्थापन केला आहे, त्या संघासोबतही मी नाही.लेले म्हणाले, की बांबोळी-कुजिरा येथे जी बैठक झाली, ती बैठक संघाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठीच होती. पण त्यात बरेच स्वयंसेवकही आले. ज्यांच्याकडे स्वयंसेवकपद वगळता संघाची अन्य कोणती जबाबदारी नाही. वास्तविक वेलिंगकर यांना कोंकण प्रांताने गोव्याच्या संघचालक पदावरून काढले नव्हते. त्यांना पदावरून हटविले असे म्हणणेही गैर आहे. त्यांना भारतीय भाषा सुरक्षा मंचचे काम अधिक स्वतंत्रपणे करता यावे म्हणून संघाच्या जबाबदारीतून मुक्त केले गेले आहे. भाषा सुरक्षा मंचला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे. ती आंदोलनाची गरज आहे. तो स्थापन करावा पण संघचालक पदावर राहून ते काम करता येणार नाही. तसे करूही नये म्हणून वेलिंगकर यांनी स्वत:हून संघचालक पद सोडावे व त्यांनी भाषा सुरक्षा मंचाचे व नव्या राजकीय पक्षाचे काम करावे असे अपेक्षित होते. तथापि, वेलिंगकर यांनी स्वत:हून पद सोडले नाही. मला वेलिंगकर यांच्याबाबत अत्यंत आदर आहे. कारण ते चांगले स्वयंसेवक आहेत पण मी त्यांच्या नेतृत्वाखालील आताच्या नव्या संघाचा भाग नाही.