पणजी : अपघात नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक कृती दलाने काही महत्त्वाच्या शिफारसी बांधकाम खात्याला केल्या आहेत. पुढील दोन महिन्यात त्याची अंमलबजावणी करून रस्ता अपघात रोखले जातील. तूर्त काही ठिकाणी गतिरोधकांसह बॅरिकेड्स वगैरे घालण्याचे काम चालू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राज्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक आणि बांधकाम ही दोन्ही खाती संयुक्तपणे काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी कामाचा आढावा घेतला.'
येणाऱ्या काळात नाताळ व नववर्षाची धूम गोव्यात असणार आहे त्यामुळे रस्त्यावर स्थानिकांची तसेच पर्यटकांची वाहने वाढतील. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी सरकार करणार आहे