शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

एप्रिलपासून वीज दरवाढ; संयुक्त वीज नियामक आयोगाची १५ रोजी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:05 PM

घरगुती ग्राहकांसाठी अशी आहे दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : प्रस्तावित वीज दरवाढीबाबत संयुक्त वीज नियामक आयोग येत्या १५ रोजी सार्वजनिक सुनावणी घेणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी वीज दरात सरासरी ६ टक्के वाढ प्रस्तावित आहे. आयोगाने दरवाढ मान्य केल्यास १ एप्रिलपासून घरगुती वीज ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट १५ ते ६० पैसे अतिरिक्त बाहेर काढावे लागतील. तसेच उच्च दाबाच्या व्यावसायिक वापराच्या विजेचे दरही वाढणार आहेत. 

विद्युत विभागाकडून दाखल केलेल्या अनेक याचिकांवर १५ रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाईल. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी दर प्रस्ताव, एकूण महसूल आवश्यकता आदी विषय चर्चेला येतील. सकाळी ११.३० वाजता येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संकुलात मिनी कॉन्फरन्स हॉलमध्ये ही सुनावणी होईल. राज्य सरकारने महसुलातील तफावत भरून काढण्यासाठी वीज दरवाढीची शिफारस केली आहे. 

व्यावसायिक कमी दाबाची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ४५ पैशांवरून ७५ पैसे प्रति किलोवॅट तासाने वापरल्या जाणाऱ्या युनिटनुसार वाढ प्रस्तावित केली आहे. याशिवाय २० किलोवॅटपर्यंत भार (लोड) असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना ५ रुपये प्रति किलो वॅट आणि २० किलोवॅटपेक्षा जास्त लोड असलेल्या ग्राहकांसाठी निश्चित शुल्कात महिना १० रुपये प्रति किलोवॅट वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.  वीज विभागाने गेल्या ३० नोव्हेंबर  रोजी संयुक्त वीज नियमन आयोगासमोर २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी दर प्रस्ताव याचिका दाखल केली होती. 

घरगुती ग्राहकांसाठी अशी आहे दरवाढ

उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ७० पैसे प्रति किलोवॅट दरवाढ प्रस्तावित आहे. याशिवाय निश्चित शुल्क २२ रुपये प्रति किलो वॅट प्रतिमहिना वाढवण्याचा प्रस्ताव आहे. उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट ७० पैसे दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाelectricityवीज