शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली 

By काशिराम म्हांबरे | Published: June 07, 2024 4:22 PM

तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे.

काशिराम म्हांबरे,म्हापसा  : तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने इमारतीच्या खाली कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारा एक व्यक्ती यात किरकोळ जखमी होण्याचा प्रकार घडला आहे. घटना आज दुपारच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती उपलब्ध होताच अग्नी शमन दलाचे जवान तसेच पोलीस तेथे दाखल झाले. दलाच्या जवानांनी इमारतीच्या बाहेरील वाहनावर कोसळलेला स्लॅबचा भाग बाजूला काढला. ही इमारत सुमारे ४५ वर्षा पूर्वीची बरीच जुनी असून ती अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. इमारतीचा वापर होत नसल्याने त्याच्या देखभालीवर दुर्लक्ष करण्यात आले होते. आज म्हापशातील शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने शहरात वाहनांची गर्दी होती. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने लोकांनी मिळेल त्या ठिकाणी आपले वाहने पार्क केली होती. त्यात इथेही वाहने पार्क करण्यात आलेली. 

नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार धोकादायक अवस्थेतील या इमारतीतील लोकांना सदर इमारत खाली करण्याची नोटिस पालिकेकडून देण्यात आली होती. तरी सुद्धा तिचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. भविष्यात असे टाळण्यासाठी आपण पालिकेजवळ विनंती करणार असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.   

इमारतीचे मालक मुकूंद कोसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत धोकादायक असल्याने तेथील भाडेकरुंना बाहेर काढून ती खाली करण्याची विनंती २०१८ साली पालिकेला करण्यात आलेली पण पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात