नारायण गावस
पणजी: राज्यात शनिवारी आणि रविवारी विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बुधवार १५ मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कायम राहणार असून गडगडाटासह वादळी वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात मागील तीन दिवसापासून विविध भागात गडगडाटासह पाऊस पडत आहे. दिवसभर उष्णता हाेत असून साय वेळी पाऊस येत आहे. त्यामुळे वातावरण माठा बदल दिसत आहे. पुढील तीन दिवस हे यलो अलर्ट असल्याने पावसाची शक्यता आहे. राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी आणि रविवार राज्यातील अनेक भागात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने रात्री गारवा तसेच थंडी पडली होती. गेले महिनाभर लाेक या उष्णतेने हैराण झाले होते. त्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळाला आहे.
तापमानाचा पारा चढाचएका बाजूने पाऊस पडत आहे दर दुसऱ्या बाजूने राज्यात तापमानाचा पारा चढत आहे. सोमवारी राजधानी पणजीत कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सियस नाेंद करण्यात आले आहे तर किमान तापमान २५.६ अंश नोंद करण्यात आले आहे. तसेच मुरगावात ३३.९ अंश तर किमान २५.७ अंश एवढे तापमान नोंद करण्यात आले आहे. मागील आठवड्यापेक्षा राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती उष्णता तसेच अवकाळी पावसामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे.