काशीराम म्हांबरे
म्हापसा: विविध कारनाम्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातील कैद्यात पुन्हा मारामारीचा प्रकार घडला आहे. चिकन वाढण्याच्या मुद्यावरून झालेल्या मारामारीत ३ कै दी जखमी होण्याचा प्रकार घडला आहे. हा मारामारीचा प्रकार बुधवारी रात्री कैद्यांना जेवण देण्याच्या वेळी घडला. बुधवारी कैद्यांना रात्रीच्या वेळी चिकन दिले जाते. यावेळी एका कैद्यानेआणखिन चिकनाची मागणी केली. केलेल्या मागणीनुसार चिकन वाढण्यास नकार दिल्याने मारामारीस कारण ठरले. यात सादिक शेख, इस्माईल मुल्ला, मुस्तफा शेख है कै दी जखमी झालेआहेत. कारागृहात कैद्यात होणारी मारामारी, सापडणारे अमली पदार्थ, मोबाईल फोन हे नित्याचे प्रकार बनलेआहेत.
कारागृहातील कैद्यांना तेथील स्वयंपाकी कैद्याकडून इतर कैद्यांना जेवण वाढले जाते. कैदी सादिक शेख हा चिकनाची ट्रॉली घेऊन कैद्यांना वाढत होता. एका ब्लॉकातील कैद्यांना वाढून नंतर तो दुसºया ब्लॉकातील कैद्यांकडे जात होता. यावेळी इस्माईल मुल्ला हा कै दी त्याच्याजवळ आला आणि आणखिन चिकनाची मागणी केली. त्यावेळी सादिकने त्याला पूर्वीच चिकन वाढल्याचे सांगून पुन्हा वाढण्यास नकार दिला. यावरून आरंभी त्यांच्यात शिविगाळ झाली नंतर त्याचे पर्यावसन मारामारीत झाले. होत असलेल्या मारामारीत इतर कैदी त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांच्यात दोन गट होऊन गटात मारामारी सुरु झाली. घडलेला प्रकार निदर्शनाला येताच कारागृहातील प्रशासनाने घटना स्थळी धाव घेऊन भांडण सोडवले तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी कैद्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमीक उपचार करण्यात आला. घडलेल्या या प्रकारावर तक्रार नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिली.