अप्पा बुवा ,फोंडा: शुक्रवारी दिवसभर फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघेजण ठार झाले आहेत तर, एकूण चार जण जखमी होण्याची घटना घडली आहे.
पहिल्या अपघातात कुंडइ येथील श्रावण हरी नाईक हा 18 वर्षीय युवक आपल्या ड्युक्स या दुचाकीने कुर्टीच्या दिशेने जात होता. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार तो भरधाव वेगात गाडी चालवत होता. कुर्टी येथील सावित्री सभागृह नजीक असलेल्या बायपास रस्त्यावर त्याचा गाडीवरचा तोल गेला व त्याने एका विजेच्या खांबाला धडक दिली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
पंचवाडी येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. एक टँकर सावर्डे येथून पाणी भरून फोंड्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणारा एका ट्रकची त्याला धडक बसली. ट्रकची धडक बसताच ड्रायव्हरचा स्टेरिंग वरील ताबा गेल व वॉटर टँकर बाजूला गेला. त्याचवेळी पेडणे येथून एक टुरिस्ट टॅक्सी प्रवाशांना घेऊन सावर्डेचे दिशेने जात होती.
टँकरची धडक सुरुवातीला त्या टॅक्सीला बसली. टॅक्सीला धडक देऊन टँकर दोन वेळा पलटी झाला. सदर अपघातात टँकरमध्ये बसलेला एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर ड्रायव्हर व क्लीनर हे जखमी झाले आहेत. ट्रक मधील जखमीना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे तर टुरिस्ट टॅक्सी मध्ये जखमी झालेल्या प्रवाशाना मडगाव येथील अस्पिसिओ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.