सद्गुरू पाटील ल्ल पणजी मंत्री, आमदारांनी त्यांच्या मालमत्तेबाबतचा अहवाल येत्या दि. ३० जूनपर्यंत सादर करावा, अशा प्रकारची नोटीस जारी करण्याचे लोकायुक्त कार्यालयाने ठरविले असल्याचे लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी शुक्रवारी येथे खास ‘लोकमत’ला सांगितले. मिश्रा म्हणाले की, लोकायुक्त कायद्यानुसार, प्रत्येक लोकप्रतिनिधीने मालमत्तेचा तपशील सादर करणे गरजेचे आहे; पण आम्ही प्रत्येकाकडे तपशील मागितला तर माझ्या छोट्याशा कार्यालयात शेकडो फाईल्स जमा होतील. सर्व लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेचा तपशील ठेवण्याएवढी जागाच लोकायुक्त कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही मंत्री, आमदारांकडील मालमत्तेचा तपशील घेऊ. (पान २ वर)
लोकायुक्तांसाठी अपुरी जागा, कर्मचारीही मोजकेच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 2:38 AM