ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 31 - पणजीप्रमाणोच म्हापसा, फोंडा, वास्को अशा सर्व प्रमुख शहरांमध्ये बहुमजली पे पार्किग प्रकल्प उभे रहायला हवेत, अशी गरज मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी व्यक्त केली. पणजीत आणखी दोन ते तीन ठिकाणी बहुमजली पे पार्किग प्रकल्प उभे होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पणजीत सांता मोनिका जेटीसमोर पर्यटन विकास महामंडळातर्फे उभारलेल्या बहुमजली पार्किग प्रकल्पाचे सोमवारी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री त्यावेळी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की आमच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प मार्गी लागले. खनिज व्यवसाय बंद झाल्याने महसुलाचा मोठा ोत थांबून देखील आम्ही अनेक प्रकल्प उभे केले. मांडवी नदीवर तिसरा पुल उभा राहत आहे. गोमेकॉ इस्पितळाजवळही अनेक प्रकल्प उभे केले.
संरक्षण मंत्री र्पीकर यावेळी म्हणाले, की बहुमजली पार्किग प्रकल्प उभा राहिला तिथे अगोदर बर्फाचा कारखाना होता. एक व्यक्ती 3क् वर्षे केवळ शंभर रुपये भाडे देऊन ही सरकारी जागा बेकायदा पद्धतीने वापरत होती. या व्यक्तीशी नवा करारच कधी झाला नव्हता. आम्ही तो कारखाना हटविला. या बहुमजली पे पार्किग प्रकल्पात विशेष व्यक्तींना प्रवेशासाठीची रचना ही व्यवस्थित करण्याची सूचना आपण पर्यटन महामंडळास केली आहे. त्यांच्याकडून ती व्यवस्था योग्य त्या नियमांप्रमाणो केली जाईल. मांडवी नदीतील कॅसिनोंसाठी जी वाहने येतात ती देखील या प्रकल्पात ठेवता येतील. कॅसिनोसाठी येणारी दुचाकी वाहने रस्त्याच्या बाजूने ठेवू नयेत.
पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल, आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर होते. मंत्री परुळेकर म्हणाले, की पर्यटन क्षेत्रत सुमारे 6क् ते 62 प्रकल्पांचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये ते प्रकल्प पूर्णही होतील. पणजीतील प्रकल्पानंतर कळंगुटमध्ये एक बहुमजली पार्किग प्रकल्प आम्ही उभा करू. अन्य शहरांमध्येही अशा प्रकल्पांची गरज आहेच.
सात दिवस मोफत पार्किग -
पणजीत सुरू झालेला पे पार्किग प्रकल्प हा गोव्यातील पहिला बहुमजली प्रकल्प आहे. पुढील सात दिवस या प्रकल्पात मोफतपणो वाहने ठेवता येतील. या प्रकल्पात वाहने ठेवल्यानंतर मग शहरात जाण्यासाठी पर्यटन महामंडळ शटल बससेवा सुरू केली जाईल, असे काब्राल म्हणाले.
(खास प्रतिनिधी)