पणजीः लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्मयासाठी आयकर खात्याकडूनही आता कंबर कसली आहे. पैसे किंवा भेट वस्तुचे मतदारांना कुणी प्रलोभन दाखवित असल्याचा संशय आल्यास तक्रार नोंदविण्यासाठी आयकर खात्याचा नियंत्रणकक्ष. २४ तास खुला राहणार आहे.
लोकांना कुठेही पैसे वाटण्यात येत असल्याची किंवा भेटवस्तु वितरीत केली जात असल्याची माहिती मिळाल्यास लोकांनी तात्काळ आकरच्या पणजी नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा आणि माहिती द्यावी, असे आवाहन आयकर खात्याकडन करण्यात आली आहे. त्यासाठी फोनकरुन, इमेल पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटूनही माहिती देण्याची मोकलीक लोकांना आहे. ज्या लोकाना माहिती देताना आपली स्वतःची ओळख गोपनीय ठेवायची आहे त्यांच्यासाठीही आयकर खात्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
माहिती देणाऱ्या लोकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे. आश्वासनही आयकर खात्याकडून देण्यात आले आहे. फोनवरू माहिती देण्यासाठी १८००२३३३९४१ ह्या टोलफ्री क्रमांकवर किंवा ०८३२२४३८४४७ या लेँडलाईनवर संपर्कर करण्याचे आवाहन आयकर खात्याडून करण्यात आले आहे. तसेच goaelections@incometax.gov.in या इमेलवर तक्रारी नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खात्याशिवाय निवडणूक आयोगाची इतर यंत्रणेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यात भरारी पथकांचा आणि नियंत्रण कक्षांचा समावेश आहे. शिवाय निवडणूक आयोगाचे खर्च. विषयक निरीक्षकही गोव्यात दाखल होणार आहेत. दोन उमेदवार वगळता इतर उमेदवारांची नावे जाहीर झाली नसल्यामुळे निरीक्षकांचे काम तसे अद्याप व्यापक तत्वावर सुरू झालेले नाही.