नारायण गावस
पणजी: राज्यात डेंग्युचे रुग्ण वाढत असून आरोग्य खात्याने यासाठी माेठी माेहीम हाती घेतली आहे. या जुलै महिन्यात राज्यात ३० सक्रिय डेंंग्युचे रुग्ण आढळून आले आहे. तर जानेवारी ते आता जुलै महिन्यात राज्यात १०० सक्रिय डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य खात्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सक्रिय डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. तरीही शहरातील झाेपडपट्टीत यंदा माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे. गेल्या वर्षी १ जानेवारी ते जुलै पर्यंत १४७ रुग्ण आढळून आले होते. यंदा १०० रुग्ण आढळून आले आहे. सुरवातीपासून आम्ही यावर्षी जनजागृती केली आहे त्यामुळे ग्रामिण भागात यंदा कमी रुग्ण आढळून आले आहे. तर शहरी भागात याचे प्रमाण जास्त झाले आहे, असे आराेग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी वाळपईत ग्रामीण भागात सुरुवातीला डेंग्यूचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे आम्ही वर्षभर ग्रामीण भागात प्रचार केला आहे. पण यंदा जे डेंग्यूचे रुग्ण आहे ते शहरी भागात. शहरातील लोकांच्या घरातील कुंडीत डेंग्यूची पैदाईस झाली आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पाेहचू शकत नाही. लोकांनी पुढे येऊन याची चौकशी करावी तसेच आराेग्य खात्याने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. तरच डेंग्यूचे रुग्ण नियंत्रणात येणार आहे, असे डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.