पणजीः शेतकऱ्यांना समजावून सांगण्या ऐवजी त्यांना भडकावण्याचे काम इंडिया आघाडी गोव्यात आणि देशातही क रीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.
आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता. शेतकऱ्यांना पावसामुळे खूपच नुकसान झाले असून त्यात काकड्या, मिर्ची, भाजी, या सह इतर उत्पादकांची पिके नष्ट झाल्याचे निलेश काब्राल आणि इतर आमदारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आले. दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वाज यांनीही आपल्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. खुद्द सभापती रमेश तवडकर यांनीही ही परिस्थिती सर्वत्र असल्याचे सांगितले.
त्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. तसेच कृषी अधिकाऱ्यांना या संबंधी. पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाईच मिळाली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाची नुकसान भरपाई दोन दिवसात वितरीत करण्यात येणार असस्याचे सांगितले.
हे सांगतानाच त्यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे. त्यांना भडकावू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे असेही ते म्हणाले. यावर विरोधकही खवळले विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी देशभर शेतकऱ्यांना भेटून तुमच्या सरकारमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आपचे आमदार वेन्झी विएगशहनेही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली,