लोकमत न्युजनेटवर्कमडगाव: चोरी प्रकरणात गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी अटक केलेला सराईत चोरटा चिमा पॉल व त्याचा साथिदार अर्जुन देसाई या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.फातोर्डा येथील एका बंद फ्लॅटात संशयितांनी चोरी करताना आतमध्ये ठेवलेले ५० लाखांचे सुवर्णलंकार चोरुन नेले होते. फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून आत शिरुन चोरटयाने वरील चोरी केली होती.
डेबरा फर्नाडीस यांनी या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ४ डिसेंबर रोजी चोरीची वरील घटना घडली होती.फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमिन नाईक यांनी चोरी प्रकरणाचा छडा लावताना चीमाला नागपूर येथून ताब्यात घेतले होते. तर नंतर त्याचा साथिदार अर्जुनला मडगावात पोलिसांनी अटक केली. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिनापैकी ९० टक्के दागिने जप्त करण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आले आहे.