पणजी : शाणू गावकर याच्या कथित खूनप्रकरणी पोलिसांनी उलट तक्रारदार चालक सतीश अर्दाळकर याचीच चौकशी चालवली आहे. काही काळ तो मुंबई, पुणे येथेही होता. त्यामुळे तेथे पोलीस चौकशी चालू आहे. चंदगड येथे त्याच्या गावी पोलिसांचे एक पथक चौकशी करीत आहे.भाजपचे पर्येतील उमेदवार विश्वजीत कृष्णराव राणे यांनी शाणू गावकर याचा दहा वर्षांपूर्वी होंडा येथील बारमध्ये गोळ्या झाडून खून केला आणि नंतर मृतदेह घाटात फेकण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. शाणू गावकर हा २00६ पासून बेपत्ता आहे. जुने गोवे चर्चच्या फेस्ताला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला होता तो परतलेलाच नाही. त्या अनुषंगाने २00६ मध्ये डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर एक-दोन महिन्यांच्या काळात घाटात अनैसर्गिक मृत्यूची नोंदणी झालेली आहे का हे पोलिसांनी तपासले; परंतु तसे काही आढळून आले नसल्याचे सांगण्यात येते.
शाणू गावकर प्रकरणी तक्रारदाराचीच चौकशी
By admin | Published: February 25, 2017 1:50 AM