शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची होणार चौकशी

By admin | Published: May 11, 2017 1:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे.संस्थेत अलीकडेच सोने तारण घोटाळा झाला होता. त्यासंबंधी संचालक मंडळाने कानावर हात ठेवल्याने संस्थेचे सभासद चिंताग्रस्त होते. संस्थेत अनेकांनी सोने तारण ठेवून कर्ज काढले असल्याने त्यांचे सोने सुरक्षित आहे की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच चौकशीचा आदेश काढल्याने संस्थेतील कथित गैरव्यवहारांचा पर्दाफाश होणार आहे.काही दिवसांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या खऱ्या सोन्याच्या जागी खोटे सोने ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता; पण त्याविषयी वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली व संस्थेची चौकशी करण्याचा आदेश दिला. याविषयी संचालक मंडळाने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी संस्थेत सोन्याचा घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे; पण तो कोणी केला याविषयी अजूनही माहिती दिलेली नाही. संचालक मंडळाने याबाबत मौनव्रत धारण केले असून हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.