शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

अंतर्गत वाद गेला न्यायालयात अन् मंदिरच पाडावे लागले; श्रीसातेरी देवीचे मंदिर ३ महिन्यात पाडण्याचा आदेश

By वासुदेव.पागी | Published: November 07, 2023 3:52 PM

अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

वासुदेव पागी, पणजी : एखादा वाद जेव्हा सामंजस्याची भुमिका घेऊन आपसात मिटविण्याचे सर्व मार्ग संपतात, तेव्हा न्यायालयाची वाट धरली जाते. न्यायालयात प्रश्न मिटतात असे नाही, परंतु केलेल्या मेहनतीवर पाणीही पडू शकते. अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

धुळापी खोर्ली येथील श्रीसातेरी रवळनाथ देवस्थानचे नवीन बांधकाम पाडणयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. देवस्थान समितीने मंदिराचे जुने बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम केल्यानंतर देवस्थान समितीचा एक गट  न्यायालयात गेला होता. नवीन बांधकाम बेकायदेशीर असल्याचे पुरावे याचिकादार पक्षाने न्यायालयात सादर केल्यामुळे तसेच प्रतिवादी पक्षाला बांधकामाच्या वैधतेचे पुरावे सादर करण्यास अपयश आल्यामुळे खंडपीठाने याचिकादाराच्या बाजुने निवाडा दिला. हे बांधकाम बेकायदेशीर ठरल्यामुळे ते ३ महिन्यांच्या कालावधीत पाडण्यात यावे असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात सुनावणी संपली होती  आणि केवळ निवाडा राहिला होता.  खंडपीठाने मंगळवारी सकाळी निवाडा सुनावला. 

बांधकाम पाडण्याचा आदेश देतानाच आणखी एक धक्का देवस्थानच्या अध्यक्षांना न्यायालयाने दिला आहे.  बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष  भिकू धुळापकर यांनाच करावा लागेल असे आदेशात म्हटले आहे. ही याचिका निकालात काढण्च्ण्यात आली आहे. येथील श्री सातेरी रवळनाथ देवस्थानच्या बांधकामाच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. देवस्थान समितीतच दोन गट पडले होते. जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिर उभारण्यास एका गटाने विरोध केला होता तर दुसऱ्या गटाने समर्थन दिले होते.

विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन बांधकाम करताना त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. वाद तेवढ्यावर थांबला नाही. या देवळात जेव्हा गेल्या मार्च महिन्यात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या प्रसंगी हा वाद उफाळून आला होता. त्यामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता. या प्रकरणात मंदिराच्या बांधकामाच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित करून एक गट अगोदरच न्यायालयात गेला होता. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय निवाडा देत नाही, तोपर्यंत मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय