नारायण गावस, पणजी: भाजप सरकारमधील अनेक मंत्री आमदार हे भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. आता सभापती रमेश तवडकर यांनी भाजपच्या एका वरिष्ट मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, याच मंत्र्यांने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धातही असाच भ्रष्टाचार केला आहे. कलाअकादमी कामात भ्रष्ठाचार केला आहे. असे अनेक भ्रष्टाचार केले आहेत. सभापती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप केले आहेत. पण आता निवडणूका जवळ असल्याने काहीच करणार नाही. भाजपचे बहुतेक मंत्री आमदार हे भ्रष्टाचारात लुबाडलेले आहेत. भाजप फक्त विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई करत आहेत. पण भाजप नेत्यांवर ईडीमार्फत चौकशी होत नाही.
पणजी स्मार्ट सिटीच्या कामातही करोडो रुपयांचा घोटाळा सुरु आहे. पण सरकार याची काहीच दखल घेत नाही. लाेक या स्मार्ट सिटीच्या खोदलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाले तरी याचे कंत्राटदार काहीच काळजी घेत नाही. एक प्रकारे सर्वसामान्य लाेकांच्या या पैशावर ही मोठी लुट सुरु आहे, असेही ॲड. पालेकर म्हणाले.