शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अनियमित वेतन; सहा वर्षे सानुग्रह अनुदान नाही!

By admin | Published: March 03, 2015 1:29 AM

पणजी : कदंब कर्मचाऱ्यांच्या अनेक दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नावर संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची तातडीची

पणजी : कदंब कर्मचाऱ्यांच्या अनेक दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नावर संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची तातडीची बैठक बुधवारी (दि. ४) होत आहे. अनियमित वेतन, तसेच गेली सहा वर्षे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. तसेच इतरही मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. ही संघटना ‘आयटक’शी संलग्न असून, सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांना विचारले असता ते म्हणाले की, २0१२ साली भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून एकाही महिन्यात कदंब कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन दिलेले नाही. १५ ते २0 तारीख झाली तरी पगार मिळत नाही. त्यामुळे पोटापाण्याची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होतो. फोन्सेका म्हणाले की, कदंब महामंडळाला दरमहा सरकारकडून ३ कोटी रुपये अनुदान मिळाले तरच महामंडळ तग धरू शकेल; परंतु सरकार अर्थसाहाय्य देत नसल्याने महामंडळाची स्थिती बिकट बनलेली आहे. नव्या बसेस खरेदी केल्या जात नाहीत. चालकांना जुन्याच बसेस चालविण्यास भाग पाडले जाते. बचतीच्या नावाखाली टायर पुन्हा पुन्हा रिमोल्डिंग करून वापरले जातात. सुटे भागही वेळीच बदलले जात नाहीत. त्यामुळे बसेसची दुरवस्था झालेली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना दरवर्षी चतुर्थीत ३५00 रुपये सानुग्रह अनुदान दिले जात असे, तेही बंद करण्यात आलेले आहे. गेली सहा वर्षे सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. सरकार ‘कदंब’मध्ये गुंतवणूक करायलाच बघत नाही. आता राज्य सरकारचा अर्थसंकल्प जवळ येत आहे, त्यामुळे त्यामध्ये आवश्यक ती तरतूद सरकारने करायला हवी. सरकार सार्वजनिक कंपन्या नेस्तनाबूत करण्यासाठी उठले आहे, असा आरोपही फोन्सेका यांनी केला आहे. (प्रतिनिधी)