शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

माणसांच्या जीवाला, इथे मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 8:42 AM

या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे. 

सांगे येथील पुलावरून एक कार सोमवारी रात्री नदीत कोसळली. त्यात महिलेसह तिच्या दोन वर्षीय तान्हुल्याचा बळी गेला. अत्यंत हृदयद्रावक, मनाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे तरी गोवा सरकारच्या यंत्रणेला जाग यायला हवी. सरकारी यंत्रणांचे काळीज जेव्हा दगडाचे होऊन जाते तेव्हा गरिबांनाच फुकट मरावे लागते. महिला, तिचा पती आणि मूल असा तिघांचा जीव गेला. या पापाचे प्रायश्चित्त खरे म्हणजे संबंधित सरकारी यंत्रणेनेच घ्यायला हवे. होय, हे पापच आहे. 

ही घटना मानवनिर्मित मानून संबंधित यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला हवा होता. तारीपाटो येथे पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे नाहीत, ते कठडे असते तर कदाचित कार खाली पडली नसती. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी नदीच्या ठिकाणी आजूबाजूचे काही दिसत नाही. कधी झाडी वाढलेली असते, तर बहुतेकदा पुलावर किंवा रस्त्याकडेला दिवाबत्तीची सोय नसते. खांबांवरील वीजदिवे पेटत नाहीत. गोव्यातील ग्रामीण भागात मुक्तीनंतरच्या साठ वर्षांत देखील अशीच स्थिती आहे. काणकोण, केपे, सांगे व सत्तरी तालुक्यांतील काही गावांतील लोकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. काणकोणमधील एका गावातील लोकांना साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असेल तर ३२ किलोमीटर चालावे लागते. मुलांना शाळेत जाण्यासाठीही अनेक किलोमीटर चालावे लागते. 

सांगेसह अनेक तालुक्यांतील छोट्या पुलांना कठडे नाहीत, रस्त्यांवर वीजदिव्यांची सोय नाही. सर्वच राज्यकर्त्यांना या स्थितीची लाज वाटायला हवी. शेकडो कोटी रुपयांची सोहळ्यांवर उधळपट्टी करणाऱ्या सावंत सरकारने तारीपांटो येथील त्या दुर्दैवी पुलावर आता तरी तातडीने कठड्यांची व्यवस्था करावी. मंत्र्यांसाठी लाखो रुपयांच्या कार खरेदी करणाऱ्या सरकारने तसेच आमदारांचे वेतन वाढवा, अशी मागणी करणाऱ्या दिगंबर कामत यांच्यासारख्या नेत्याने सांगेतील या दुर्दैवी घटनेसाठी डोळ्यांतून दोन अश्रू ढाळले तर बरे होईल.कुमयामळ सांगे येथे राहणाऱ्या नाईक कुटुंबाचा सोमवारच्या अपघाताने बळी घेतला. रात्री आठच्या सुमारास या कुटुंबाची कार पुलावरून नदीत गेली. त्यात पती, पत्नी व लहान मूल असा तिघांचा जीव गेला. 

गोव्यात अशा घटना सहसा घडत नाहीत. महाराष्ट्र व अन्य मोठ्या राज्यांतील गरीब व मागास जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात. सांगेतील घटनेने गोव्यातील संवेदनशील लोकांचे काळीज खरोखर हलले. सोमवारी पहिल्या रात्री आई व मुलाचा मृतदेह मिळाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी मुलाचे वडील मिलिंद नाईक यांचा मृतदेह सापडला. अरेरे, असे व्हायला नको होते, अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त झाली. घरी राहिलेली मुलगी वाचली. असा मृत्यू कुणाच्याच वाट्याला येऊ नये. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने जागे होण्याची वेळ आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना पुलासाठी संरक्षक कठड्याची तातडीने सोय करावी लागेल. मुख्यमंत्री सावंत यांनी किंवा सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पोर्तुगीजकालीन खुणा पुसण्याच्या मागे नंतर लागावे, अगोदर लोकांचे जीव वाचविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभ्या केल्या तर गोव्यावर उपकार होतील.

हळदोणा मतदारसंघातील कालवी येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये घडलेल्या मोठ्या दुर्घटनेची आठवण काल अनेकांना झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी बस नदीत पडून सहा जणांचा बळी गेला होता. त्यात आठ ते दहा वर्षांच्या चार विद्यार्थिनी होत्या. पूर्ण गोवा हादरला होता. त्यावेळी जनभावना एवढी संतप्त होती की, आमदार दयानंद नार्वेकर यांचा २०१२च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नार्वेकर पुन्हा विधानसभेत पोहोचलेच नाहीत, हा वेगळा मुद्दा. गोव्यातील सर्व छोट्या व मोठ्या पुलांचे सर्वेक्षण करून कठडे उभारण्याचे काम आता तरी बांधकाम खात्याने करावे. कमकुवत झालेले कठडे नव्याने बांधून द्यावे.

टॅग्स :goaगोवा