काशिराम म्हांबरे, म्हापसा: सध्या सुरु असलेल्या इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज म्हापशातील बाजारपेठेत निदर्शने करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात काही विदेशी पॅलेस्टाईन समर्थक तसेच परराज्यातील नागरिकांनी एकत्रित येऊन रॅली काढली. पोलिसांनी रॅली रोखण्याचा प्रयत्न केला असता विरोध झुगारून निदर्शने करण्यात आली.
मागील काही महिन्यापासून गाझा पट्टीत इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशात युद्ध सुरु आहे. या युद्धात दोन्ही देशांनी शस्त्रांचा केलेल्या वापरामुळे अनेक निरपराध नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.
म्हापसा बाजारपेठेत सुरु असलेल्या या युद्धाला विरोध करुन पॅ लेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या काही समर्थकांनी निदर्शनेकरुन शहरातून रॅली काढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळतात मामलेदार प्रवीण गावस यांनी पोलिसांना रॅली बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बाजारात जाऊन रॅली रोखून धरली अणि रॅली साठी वापरलेले साहित्य जप्त केले.