पणजी: लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एसटी समाजाला राजकीय आरक्षणाबाबत सरकारने अधिसूचना जारी करावी.आमची सहनशीलता पाहू नये असा इशारा देत एसटी बांधवांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली.
राजकीय आरक्षण देण्याची मागणी नवी नसून अनेक वर्षापासून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मग तुम्हाला एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यापासून कोण रोखत आहे, सरकारने याचे उत्तर द्यावे असा प्रश्नही त्यांनी केला.
एसटी समाजाचे नेता रुपेश वेळीप म्हणाले, की राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे मिळावे यासाठी आमही वारंवार मागणी करीत आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदारांची भेट घेऊन त्यांना निवेदने सादर केली.मुख्यमंत्र्यांनी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करु असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासना नंतर मंत्रीमंडळाच्या दोन बैठका झाल्या. परंतु सरकारने अजूनही या आरक्षणासाठीची प्रक्रिया सुरु केली नसल्याचे त्यांनी सांगितले.