लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : केंद्र आणि भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार असून भाजप जुमला सरकार म्हणून नावारूपास येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना घरचा मार्ग दाखवा, असे आवाहन काँग्रेसगोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.
पेडणे मतदारसंघात काँग्रेसतर्फे 'हात से हात जोडो' अभियानाचा शुभारंभ १६ मार्च रोजी पेडणे येथील भगवती देवीला श्रीफळ अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे, म उत्तर गोवा अध्यक्ष वीरेश शिरोडकर, काँग्रेसने नेते जितेंद्र गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
अमित पाटकर म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियानांतर्गत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असा उपक्रम राबवला, त्याचाच एक भाग म्हणून हात जोडो अभियान राज्यात सुरू असल्याचे सांगितले.
भाजप सरकार आणि मागच्या नऊ वर्षांपासून जनतेला आश्वासने दिली व फसवणूक केली. त्यांचा पाढा वासासाठी मे अभियान महत्त्वाचे ठरत आहे. लोकांना याविषयी माहिती देणार असल्याचे अमित पाटकर यांनी सांगून मोपा विमानतळ जानेवारी २०१३ रोजी सुरू झाला. त्या अगोदर भूमिपुत्र शेतकऱ्यांना नोकऱ्यांत का प्राधान्य दिले नाही. विमानतळ सुरू झाल्यानंतर लोकांना का फसवले जाते, असे पाटकर म्हणाले. काळ्या, पिवळ्या टॅक्सींसाठी स्टॅण्ड उपलब्ध केला जात नाही, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
मनोहर पर्रीकर म्हणण्यास लाज कसली?
अमित पाटकर यांनी यावेळी मोपा विमानतळासंदर्भात जे नावाचे राजकारण सुरु केले, त्यात मनोहर असे नाव देऊन सरकारला काय साध्य करायचे होते? त्यांना मनोहर पर्रीकर असे नाव द्यायला लाज वाटते की काय, असाही सवाल करुन आताही योग्य वेळ आली आहे, भ्रष्ट जुमला पार्टीला गोव्याची संस्कृती नष्ट करू पाहत आहे. आता सर्वांनी एकत्रित येऊन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याची गरज आहे. महागाई वाढली, तरीही भाजप सरकार आवाज करत नाही. गॅस दरवाढ झाली, तरीही भाजपच्या महिला रस्त्यावर येत नाहीत. त्यांना गॅस कसा परवडतो. सरकारकडून सुरू असलेल्या दिशाभूलबद्दल त्यांनी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"