शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शिरोडा येथे झाडावर धडकली कदंबा, 11 प्रवासी जखमी

By आप्पा बुवा | Published: September 17, 2023 4:55 PM

बिबळ येथील धोकादायक वळणावर बसचे स्टेरिंग लॉक झाले. परिणामी ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला व बसने सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार धडक दिली.

फोंडा - बिबळ शिरोडा येथे सकाळी सव्वा सातच्या दरम्यान एका धोकादायक वळणावर कदंबा प्रवासी बसचा तोल गेला व बसने सरळ आंब्याच्या झाडाला धडक दिली. सदर अपघातात एकूण 11 प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी तीन प्रवाशावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले तर इतर आठ जणांवर अजूनही इस्पितळात उपचार चालू आहेत.

सविस्तर वृत्तानुसार फोंडा असा दररोज प्रवास करणारी कदंबा क्रमांक जी ए-०३- एक्स -०४१४ ही नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन फोंडा कडे येण्यासाठी निघाली होती. बिबळ येथील धोकादायक वळणावर बसचे स्टेरिंग लॉक झाले. परिणामी ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटला व बसने सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जोरदार धडक दिली. सदरची धडक बसताच बसमध्ये बसलेल्या प्रवाशी  एकमेकावर आपटल्याने तसेच सीट वर  पडल्याने 11 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवासीना तातडीने अगोदर शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यापैकी आठ लोकांना अधिक उपचाराची गरज भासताच त्यांना मडगाव येथील होस्पिसिओमध्ये दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपचार करून घरी पाठविण्यात आले.

यात जखमी झालेली सुचिता गावकर (४०, पाज -शिरोडा) हिला अधिक उपाचारासाठी गोमेकोत नेण्यात आले आहे. तर बस चालक राघोबा नाईक (५४, भाटी ), बस वाहक गुणा गावकर ५७, बोरी)  येसू वेळीप (६५, पाज -शिरोडा ), सुनीता गावकर (४३), चंद्रिका गावकर (४१), सुलक्षा गावकर (४५), अनिशा वेळीप (५२,सर्व जण बिबळ- शिरोडा) अशी जखमी प्रवाशांचे नावे आहेत.

निमुळता रस्ता अपघातास कारण

सदरचा रस्ता हा खूपच निमुळता व अरुंद असल्याने येथे वारंवार अपघात घडत असतात. काही दिवसापूर्वी या परिसरात एक बालरथ अशाच प्रकारे अपघात ग्रस्त झाला होता. सरकारने हा रस्ता रुंद करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. 

सुट्टी नसते तर?

इथून निघणारी ही पहिली बस असल्याने ह्या बस वर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. औद्योगिक वसाहत व इतर ठिकाणी कामाला जाणारे प्रवासी या बसचा पर्याय निवडतात. त्यामुळे नेहमी ही बस खचाखच भरलेली असते. काल रविवार असल्याने प्रवासी कमी होते.

जास्त विक्रेत्या महिला

कालपासून फोंडा येथे माटोळी सामान विक्रीस आलेले असून सदर बस मध्ये सुद्धा फोंडा येथे माटोळीचे सामान विक्रीस नेणाऱ्या महिला विक्रेत्या प्रवास करत होत्या. प्रवासी वाहन अपघात ग्रस्त झाल्याने त्यांना बाजार सोडून इस्पितळात जावे लागले. माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर यांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपल्या स्वतःच्या वाहनाने काही जखमींना इस्पितळात पोहोचवले.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात